PNE26W20263 आर. आर. कल्लुर
PNE26W20262 मीनाक्षी कल्लुर
विजयपुरात उद्या कल्लुर दाम्पत्याच्या पुतळ्यांचे अनावरण
मठाधीश, मंत्री, खासदार, आमदारांची असणार उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : इंडीचे माजी आमदार कै. आर. आर. कल्लुर तसेच विजयपूर जिल्हा महिला बँकेच्या संस्थापक अध्यक्षा कै. मीनाक्षी कल्लुर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी (ता. २१) पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. विजयपूर येथील आश्रम रस्त्यावरील कित्तुर राणी चन्नम्मा समुदाय भवनात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास सुत्तुरु मठाचे जगद्गुरू श्री शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच वनश्री संस्थानचे श्री जयबसव स्वामी, महायोगी वेमन संस्थानचे श्री वेमनानंद स्वामी, विजयमहांत संस्थानचे श्री गुरुबसव महांत स्वामी, ज्ञानयोगाश्रमाचे अध्यक्ष श्री बसवलिंग स्वामी, मुक्ती मंदिरच्या मातोश्री सुगलादेवी अम्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री एम. वीरप्पा मोईली, माजी मुख्यमंत्री धर्मसिंग यांच्या पत्नी प्रभावती धर्मसिंग, इंडीचे आमदार यशवंतरायगौडा पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास मंत्री एम. बी. पाटील, एच. के. पाटील, शिवानंद पाटील, दिनेश गुंडुराव, आमदार अजयसिंग, साबण मंडळाचे अध्यक्ष सी. एस. नाडगौड, खासदार गोविंद कारजोळ, रमेश जिगजिणगी, पी. सी. गद्दीगौडर तसेच आमदार बसनगौडा पाटील, लक्ष्मण सवदी, जे. टी. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. मल्लिकार्जुन कल्लुर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.