Kalyani Nagar Accident  sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : नातू दारू पितो, हे माहीत होते का? ;पोलिसांकडून वडील, आजोबांवर प्रश्नांचा भडिमार

कल्याणीनगरमधील अपघातप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्राला समोरासमोर बसवून चौकशी केली. नातवाला जामीन मिळावा, यासाठी सुरेंद्रकुमार यांनी न्यायालयात हमी दिली होती. याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

कल्याणीनगरमधील अपघातप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्राला समोरासमोर बसवून चौकशी केली. नातवाला जामीन मिळावा, यासाठी सुरेंद्रकुमार यांनी न्यायालयात हमी दिली होती. याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तसेच सुरेंद्रकुमार आणि विशाल यांना अल्पवयीन मुलगा दारू पितो, हे माहीत आहे का? तसेच तो वाहन परवाना नसताना मोटार कसा काय चालवत होता, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

घरातून मोबाईल जप्त

विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर साधा मोबाईल आढळून आला होता. परंतु त्यांनी मूळ मोबाईल लपवून ठेवला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तो मोबाईल त्यांच्या घरातून जप्त केला. त्यात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोटारचालक गाडीत होता का?

मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे, तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली असल्याचे चालक गंगाराम डोळसने त्यांच्या जबाबात सांगितले होते. याबाबत पोलिसांनी चालकाची चौकशी केली. परंतु तो मोटारीत होता की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

दिल्लीतील मित्राला हजर राहण्याचा आदेश

अपघातावेळी अल्पवयीन आरोपीसमवेत त्याचे दोन मित्र होते. त्यापैकी एका मित्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दिल्लीतील अन्य एका मित्राला उद्या गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी धक्काबुक्की

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना चौकशीसाठी पोलिस आयुक्त कार्यालयात आणल्यानंतर वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारले. मात्र, त्यावेळी अग्रवालच्या निकटवर्तीयांकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अरेरावीची भाषा आणि धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे काही वेळ पोलिस आयुक्त कार्यालयातील वातावरण गंभीर बनले होते.

मोटारीची ‘फॉरेन्सिक’ तपासणी

पोलिसांनी जप्त केलेल्या अपघातग्रस्त मोटारीची ‘फॉरेन्सिक’च्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. या मोटारीची वेग मर्यादा, गाडीतील कॅमेरे, चित्रीकरण, अपघातानंतर झालेली मोटारीची स्थिती याचा पथकाने आढावा घेतला. याबाबतचा अहवाल लवकरच पोलिसांना सादर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT