Kalyani Nagar Accident News  sakal
पुणे

Kalyani Nagar Accident News : धमकी देत चालकाकडून मोबाईल घेतला;मुलाच्या आजोबा-वडिलांबाबत पोलिसांची न्यायालयात माहिती

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलासोबत असलेल्या मोटारचालकाचा मोबाईल आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांनी धमकावून काढून घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

सकाळ वृत्तसेवा

बेधुंदशाही

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलासोबत असलेल्या मोटारचालकाचा मोबाईल आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांनी धमकावून काढून घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

सुरेंद्रकुमार यांना शनिवारी (ता. २५) सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. ‘गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरून फिर्यादी गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांचे कपडे आरोपीच्या राहत्या घरातून हस्तगत करण्यात आले आहेत.

आरोपीचा या गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाला असून त्या अनुषंगाने सविस्तर तपास करून पुरावा हस्तगत करावयाचा आहे. तसेच फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी बीएमडब्ल्यू गाडीचा वापर केला असून ती गाडी शोधून जप्त करायची आहे, त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी,’ असा युक्तिवाद बी. एच. डांगळे यांनी केला.

आरोपीच्यावतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करीत पोलिस कोठडीस विरोध केला. ‘अपघाताच्‍या दिवशी सुरेंद्रकुमार हे पत्नीसह दिल्लीत होते. आत्तापर्यंतच्या तपासात त्यांनी पोलिसांना सहकार्य केले असून ते परत आल्यापासून पुण्यातच आहेत.

त्यांना अटक करताना अटकेची ‘चेकलिस्ट’ पाळण्यात आलेली नाही. अपघातानंतर स्वतःच्या जिवाचे काही बरे-वार्इट व्हायला नको म्हणून फिर्यादी हे अग्रवाल यांच्या बंगल्यातील नोकरांच्या रुममध्ये थांबले होते,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. बर्डे यांनी सुरेंद्रकुमार यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा एकमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT