Kalyani Nagar Accident sakal
पुणे

Kalyani Nagar Accident : सुरेंद्रकुमार यांनी आणखी एकाला दिली होती धमकी?

अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी कनेक्शन समोर आल्यावर त्यांनी आणखी एकाला धमकी दिल्याचे समोर आले. याबाबत २०२१ मध्ये पोलिस आणि सीबीआयकडे तक्रार अर्ज दिला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी कनेक्शन समोर आल्यावर त्यांनी आणखी एकाला धमकी दिल्याचे समोर आले. याबाबत २०२१ मध्ये पोलिस आणि सीबीआयकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पुन्हा पोलिसांकडे तक्रार अर्ज देणार असल्याची माहिती मुश्ताक शब्बीर मोमीन यांनी दिली.

बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली होती. शिवसेना नेते अजय भोसले यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

त्यानंतर सुरेंद्रकुमार यांनी २०२१मध्ये कोंढवा येथील एका जागेच्या व्यवहाराबाबत आर्थिक फसवणूक केली. तसेच कार्यालयात बोलावून मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप मोमीन यांनी केला आहे. याबाबत पोलिस, सीबीआय आणि राज्यपालांकडे तक्रार केली. परंतु अद्याप न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara News : कंत्राटी महिलांनाही आता २६ आठवडे प्रसूती रजा, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

FIFA World Cup: श्वास रोखून धरणारा सामना! ९२ व्या मिनिटाला गोल अन् कॅनडाची उपांत्यपूर्व फेरीत धडक, इतिहासही घडवला

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Chandrapur: लग्नाला वर्ष झालं तरी मूलबाळ नाही, मी मदत करतो; १९ वर्षीय विवाहितेवर बळजबरी, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा

Pune News : मद्यपान करून रेल्वे प्रवास करणाऱ्यांना दणका; दोषी आढळल्यास आता थेट कारवाई

SCROLL FOR NEXT