Kalyaninagar Pune Accident sakal
पुणे

Kalyaninagar Pune Accident : स्वतः लॉजमध्ये, चालक महागड्या हॉटेलात;छ. संभाजीनगरमध्ये बसले होते लपून

मोटारचालक अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी पुण्याहून आलिशान मोटीने चालक चत्रभूज डोळस आणि राकेश पौडवाल यांच्यासोबत पळ काढला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मोटारचालक अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारी पुण्याहून आलिशान मोटीने चालक चत्रभूज डोळस आणि राकेश पौडवाल यांच्यासोबत पळ काढला. रात्री एक ते सव्वाच्या सुमारास ते नगरमार्गे शहरात दाखल झाले. चालक डोळस याने अग्रवाल यांना रेल्वे स्थानक रस्त्यावरील जीएम प्लाझा या साधारण लॉजपाशी सोडले. यानंतर डोळस नारळीबाग येथील जेपी इंटरनॅशनल हॉटेलकडे निघून गेला.

पुणे गुन्हे शाखेचे पथक अग्रवाल यांच्या मागावरच होते. जीपीएस ट्रॅकिंगवरून त्यांचा माग सुरू होता. अग्रवाल हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी रिसेप्शनकडे रूमची मागणी केली. त्यांनी तोंडाला मास्क लावलेला होता. उच्च न्यायालयात वकिलाकडे सकाळी काम आहे, भेटून लगेच जाणार आहे, असे कारण सांगून त्यांनी रजिस्टरमध्ये नोंद केली. या वेळी त्यांनी कुठे जेवण भेटेल का? अशीदेखील विचारणा केली. दीड वाजले होते.

लॉजचालकाने अग्रवाल यांना पहिल्या मजल्यावरील रूम दिली. अवघे एक हजार रुपये या हॉटेलचा एका दिवसाचा दर आहे. अग्रवाल थांबल्यानंतर दीड तासाने गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ पथकासह हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी जेपी इंटरनॅशनल हॉटेलवरून चालक डोळस याला ताब्यात घेतले होते. डोळस यानेच अग्रवाल यांना या हॉटेलमध्ये सोडल्याची माहिती दिली. पथकाने अग्रवाल, डोळस आणि पौडवाल यांना ताब्यात घेत गुन्हे शाखा गाठली. यानंतर पुणे गुन्हे शाखेने तिघांना मोटारीसह ताब्यात घेतले.

असे अडकले जाळ्यात

  • पुणे पोलिसांनी अग्रवालच्या मोटारीच्या जीपीएस ट्रॅकरचा माग काढला होता.

  • मोटार नारळीबाग परिसरात असल्याची माहिती मिळाली होती.

  • पुणे पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

  • गुन्हे शाखेने नारळीबाग येथील जे. पी. इंटरनॅशनल हॉटेल गाठले.

  • येथून राकेश भास्कर पौडवाल (वय ५१, रा. नटराज रेसिडेन्सी, धनकवाडी) आणि चालक चत्रभूज डोळस (वय ३४, वडगाव शेरी, पुणे) यांना ताब्यात घेतले.

  • चालकाने मालक अग्रवाल याला जीएम प्लाझा येथे सोडल्याची माहिती दिली.

  • या हॉटेलवरून विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतले.

डोंट वरी, कायदेशीर कारवाईला तयार

पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी आपली ओळख करून देत अग्रवाल यांना ताब्यात घेत असल्याचे सांगितले. या वेळी अग्रवाल यांनी ‘डोंट वरी.... आपण कायदेशीर कारवाईला तयार आहे,’ असे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुणे पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार या कारवाईवर लक्ष ठेवून होते. याबाबत कोणालाही माहिती देण्यास तसेच फोटो काढण्यास मनाई करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chadchan Crime Six Killed Land Dispute : महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर जमिनीच्या वादातून हत्याकांड, सहा जणांची धारधार शस्त्रांनी हल्ल्यानंतर गोळ्या घालून निर्घृण हत्या

Latest Marathi Update Live: विदर्भातील पाचही विधान परिषद जागांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी

Travels Bike Accident : खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक; चार तरुणांचा जागीच मृत्यू

Sai Sudharsan Hit Wicket: साई सुदर्शनची बॅट पुन्हा स्टम्पवर पडली, शुभमनने डोक्यावर हात मारला; विचित्र विकेटचा Video Viral

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT