पुणे

कऱ्हाड आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या

CD

कऱ्हाडला आवाजाच्या मर्यादा ओलांडल्या

दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत पोलिसांच्या पुढ्यातच डीजेचा दणदणाट


कऱ्हाड, ता. २१ ः कायदे कागदावर, नियम हवेत आणि सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील, अशी अवस्था शहरात काल पार पडलेल्या दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाला. निवडणुकीतील डीजेच्या आवाजाच्या मर्यादेचे झालेले उल्लंघनाचे विदारक चित्र अनुभवयास मिळाले. शहरात ४५ सार्वजनिक दुर्गादेवींच्या मूर्तींचे विसर्जन झाले. त्यातील तब्बल ३० मंडळांनी प्रशासनाला थेट आव्हान देत मोठ्या आवाजाची ध्वनिक्षेपके आणि डीजेचा दणदणाट केला.
दुर्गादेवीच्या विसर्जनामुळे शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही मोठ्या आवाजाच्या दणदणाटाला कोणीही रोखू शकले नाही. अधिकाऱ्यांच्या व पोलिसांच्या डोळ्यांदेखत दमदणाट सुरू असतानाही, खाकीने कोणतीही आडकाठी न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली. विसर्जन मिरवणुकीत ३० हून अधिक मंडळांनी आवाजाच्या डेसिबलच्या मर्यादा ओलांडल्या. लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना कर्णकर्कश आवाजामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.
दर वर्षी प्रशासनाकडून शांतता बैठकांचा फार्स केला जातो आणि नियमांचे पालन करण्याचे इशारे दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात विसर्जनाची वेळ आली, की पोलिस प्रशासन आणि आयोजक यांच्यातील साटेलोटं उघड होते. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या तांडवामुळे कऱ्हाडची शांतता पूर्णपणे कोलमडली. कऱ्हाडकरांच्या सहनशीलतेचा आता अंत झाला आहे. केवळ कागदी नोटिसा न दाखवता, नियमांची पायमल्ली करणाऱ्या त्या ३० मंडळांवर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस प्रशासनावर वरिष्ठांकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

PNE26W60572
कऱ्हाड ः दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांनी लावलेल्या डीजेच्या आवाजाने साऱ्या मर्यादा तोडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Data Leaked: HDFC बँकेत खळबळ! गोपनीय माहिती बाहेर कशी गेली?

SA vs AUS 2nd Test : दक्षिण आफ्रिकेने 'फास' आवळला! रबाडाच्या 154.5 kph वेगाच्या चेंडूने हेड हडबडला... यान्सेनने करेक्ट कार्यक्रम केला

“ कधी-कधी बाबांना स्टेशनवर झोपायला लागायचं” ललित प्रभाकर बालपणीच्या आठवण सांगताना म्हणाला, 'वन रुम किचनमध्ये बाथरूम, मोरी'

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी आणखी एकाला अटक, गुजरातमधून पोलिसांनी घेतलं ताब्यात

Anushka Gurav Success Story : अंगणवाडी सेविकेची लेक थेट अमेरिकेत! मसूरच्या अनुष्का गुरवची आंतरराष्ट्रीय कंपनीत 'सॉफ्टवेअर इंजिनिअर' म्हणून निवड, सिस्को कंपनीत मिळवले मोठे पॅकेज

SCROLL FOR NEXT