पुणे

‘लाडकी बहीण’च्या जागरूकतेची ‘उमेद’ला साथ; करजगीत 100 बचत गटांची प्रगतीची भरारी

CD

JEU२६B०८३१९
अक्कलकोट : तालुक्यातील करजगी येथील बचत गटाच्या नियमित बैठकांचे छायाचित्र.

एक हजार महिलांची आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल
‘लाडकी बहिणीं’च्या जागरूकतेची ‘उमेद’ला साथ; करजगीत १०० बचत गटांच्या प्रगतीची भरारी

राजशेखर चौधरी : सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. २९ : महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून करजगी (ता. अक्कलकोट) येथे महिलांच्या बचत गट चळवळीला मोठी गती मिळाली आहे. पूर्वी गावात ७० बचत गट कार्यरत होते. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाबाबत जागरूकता वाढली. त्यामुळे नव्याने ३० बचत गटांची स्थापना झाली असून, सध्या गावात १०० हून अधिक बचत गट कार्यरत आहेत. मासिक बचत वर्गणीही १०० रुपयांवरून २०० रुपये करण्यात आली आहे.
प्रत्येक बचत गटात १० ते १२ महिलांचा सहभाग असून, या गटांमधून सुमारे १,००० ते १,१०० महिला आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. अनेक महिलांनी सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रातही प्रगती साधली आहे. बचत गटातील महिलांनी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर बँकांचा विश्वास संपादन केला आहे. गटांच्या माध्यमातून कर्ज घेऊन त्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीत हातभार लावत आहेत. अनेक गटांनी एक लाख, दोन लाख आणि पाच लाख रुपयांच्या कर्जाचे टप्पे यशस्वीपणे पार केले असून, आता आठ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमर्यादेपर्यंत पोचण्यास सुरुवात केली आहे.
करजगी येथील समर्थ महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा चंद्रकला कारीमुंगी व सचिव चंद्रकला बिराजदार यांनी गावातील महिलांना एकत्रित करून अनेक बचत गटांच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. सुरुवातीला आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन दरमहा केवळ १०० रुपयांची बचत सुरू करण्यात आली. त्यानंतर बँकांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने कर्ज घेऊन गटांनी आर्थिक प्रगती साधली.
प्रत्येकी सुमारे ३० बचत गटांसाठी एक ग्रामसंघ, याप्रमाणे करजगी येथे सध्या तीन ग्रामसंघ कार्यरत आहेत. त्यापैकी कारीमुंगी यांचा ‘ओम ग्रामसंघ’ सक्रिय आहे. परिसरातील विविध गावांतील ग्रामसंघांना एकत्रित करून ‘महात्मा जोतिबा फुले प्रभाग संघ’ही कार्यरत आहे.
या संघांच्या नियमित बैठकीत बचत गटांची प्रगती, आर्थिक व्यवहार, भविष्यातील नियोजन तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला जातो. रेणुका खजूरगी, यल्लव्वा पुरुषोत्तम, ज्योती खजूरगी, धुंडव्वा मद्री, राणी गंगदे, लक्ष्मी खजूरगी आणि सावित्री फुलारी या ग्रामसखी व बँक सखी म्हणून महिलांना मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. उमेद अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही बचत गटांना सातत्याने सहकार्य मिळत असून, करजगीतील ही चळवळ आर्थिक स्वावलंबनाचे प्रभावी उदाहरण ठरत आहे.

चौकट
महिलांनी उभारले विविध व्यवसाय
कधीही घराबाहेर न पडलेल्या महिला आता या योजनेमुळे बँक व्यवहार करू लागल्या आहेत. तसेच शिलाई मशिन, शेळ्या, गाई व म्हशींचे संगोपन, शेंगा चटणी व कडक भाकरी उद्योग, लोणचे उद्योग, द्रोण व पत्रावळे निर्मिती, दुग्ध व्यवसाय यांसह अनेक व्यवसायांत उतरून प्रगती साधत आहेत.

कोट
JEU२६B०८३१७
करजगी गावातील १००० पेक्षा जास्त महिला उमेदच्या सहकार्याने शंभर बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत आहेत. लाडकी बहीण योजना आल्यानंतर सर्वांना आर्थिक सहकार्य मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर महिला बचत गट स्थापन करून नियमित वर्गणी भरून प्रगती साधत आहेत. आमच्या गावासाठी ही निश्चितच भूषणावह गोष्ट आहे.
- चंद्रकला कारीमुंगी, अध्यक्षा, समर्थ महिला स्वयंसहाय्यता समूह, करजगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT