पुणे

करमाळ्यात शिक्षक मतदारसंघात ८९.२१ टक्के मतदान पदवीधर मतदारसंघात ६३.३९ टक्के मतदान; निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले

CD

KOR26B11172
करमाळा : शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी मतदानाला एकत्र निघालेले विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, युवा नेते दिग्विजय बागल व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक.

लोगो : करमाळा तालुका

मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ
शिक्षकसाठी ८९.२१, तर पदवीधरसाठी ६३.३९ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. २३ : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी करमाळा तालुक्यात शांततेत मतदान झाले. शिक्षक मतदारसंघात ८९.२१ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६३.३९ टक्के मतदानाची नोंद झाली. तालुक्यातील आठ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.
निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजप-महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मतदारांपर्यंत पोहोचण्यासह त्यांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती. मतदारांना विविध प्रकारची आमिषे दाखविल्याची चर्चाही रंगली.
शिक्षक मतदारसंघात तुलनेने उत्स्फूर्त मतदान झाले. एकूण १,३९० मतदारांपैकी १,२४० शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघात मात्र मतदानाचा टक्का कमी राहिला. एकूण ४,८७४ मतदारांपैकी ३,०४१ मतदारांनी मतदान केले. करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील मतदान केंद्रावर मतदारांची संख्या अधिक असल्याने परिसरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची दिवसभर गर्दी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

IND vs NZ T20 : भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकणार

SCROLL FOR NEXT