Karve Road Pune Sakal
पुणे

पुणे : मोदींच्या दौऱ्यानिमित्त कर्वे, पौड रस्ता तात्पुरता बंद

सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत रस्ता बंद, वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरातील मेट्रोच्या लोकार्पणासह विविध कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (ता.6) पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत पौड रस्ता व कर्वे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता आणि पौड रस्ता (शिवतीर्थनगर) येथील वाहतुक रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतुकीतील बदल व पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे ः

* गरवारे कॉलेज ते आनंदनगर मेट्रो जंक्‍शन येथील मुख्य कार्यक्रमामुळे खंडोजीबाबा चौक येथुन पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगरपर्यंत जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

- पर्यायी मार्ग - कर्वे रस्त्यावरुन कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक चौकातून लालबहादूर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूलमार्गे डीपी रस्त्याने कोथरूडकडे जावे किंवा दांडेकर पूल मार्गे डीपी रस्त्याने गुळवणी महाराज पथ, करिश्‍मा सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे.

* पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगरकडून खंडोजीबाबा चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे.

- पर्यायी मार्ग - शिवतीर्थनगरकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांनी मयूर कॉलनी, निंबाळकर बाग, डीपी रस्ता किंवा गुळवणी महाराज रस्त्याने नदीपात्रातून डेक्कन जिमखाना किंवा सेनादत्त पोलीस चौकी, शास्त्री रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT