पुणे

पुणे - काश्‍मिर सफरचंद हंगाम सुरू, मात्र उत्पादन घटल्याने लवकर आटोपणार

CD

काश्‍मिरी सफरचंदाचा हंगाम सुरू

पुण्यात आवक; हंगाम लवकर आटोपण्याची शक्यता

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : पुणे बाजार समितीमध्ये काश्मीर आणि हिमाचल सफरचंदाचा हंगाम गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. श्रावण महिना आणि गणेशोत्सवात हंगाम बहरात येईल. मात्र हवामानाच्या फटका आणि ऑनलाइन कंपन्यांमुळे बाजारात आवकेत घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

हंगामाबाबत बोलताना अडते करण जाधव म्हणाले, ‘‘आवक घटल्याने दरवर्षी नियमित अडीच महिने चालणारा हा हंगाम यंदा अवघ्या महिनाभरातच म्हणजे सप्टेंबरअखेर संपण्याची शक्यता आहे. त्यातच बड्या कॉर्पोरेट कंपन्या थेट बागेत जाऊन उच्च दर्जाचा माल खरेदी करत असल्याने घाऊक बाजारात सरासरी दुय्यम दर्जाचा माल येत आहे. दुसरीकडे, काश्मीरमधील ‘गाला’ सफरचंदाची आवक यंदा वेळेआधीच सुरू झाली असून, दर्जानुसार त्याला बाजारात चांगली मागणी मिळत आहे.’’

१५-२० वर्षांतील सर्वांत खराब हंगाम
दरवर्षी जुलैअखेर सुरू होणारा हिमाचलचा हंगाम ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतो. मात्र यंदा हवामानातील बदलांमुळे कमी उंचीवरील सफरचंदाचे मोठे नुकसान झाले. हा माल आता संपत आला असून, त्यातील ९० टक्के माल अत्यंत लहान आकाराचा (पिट्टू) निघाला आहे. सध्या मध्यम उंचीवरील हंगाम सुरू झाला असून, हा हंगाम १५ दिवस चालेल. त्यानंतर जास्त उंचीवरील माल बाजारात येईल. मात्र एकूण उत्पादनच अत्यल्प असल्याने हा हंगाम सप्टेंबरअखेर संपेल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कंपन्यांची थेट बागेत खरेदी; बाजारात दुय्यम दर्जाचा माल
सध्या रिलायन्स, अदानी, जेमट्री, ब्लिंकिट, महिंद्रा, जेएसओ यांसारख्या मोठ्या कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन सरासरी १२० रुपये प्रति किलो दराने ट्रेमध्ये माल खरेदी करत आहेत. सेन्सर आणि अत्याधुनिक ग्रेडिंग मशिनद्वारे कंपन्या केवळ उच्च प्रतीचा (‘ए’ ग्रेड) माल निवडून घेतात आणि उर्वरित माल शेतकऱ्यांकडे परत करतात. शेतकरी हा राहिलेला माल पॅक करून देशभरातील घाऊक बाजारात पाठवत असल्याने सध्या बाजारात (दुय्यम प्रतीचा) माल जास्त येत आहे.
----
...असे आहेत दर
घाऊक आणि किरकोळ बाजारातील दर
हिमाचल सफरचंद २४ ते २५ किलोच्या बॉक्सला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार २ ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात सफरचंद २०० ते २२५ रुपये प्रति किलोने विकले जात आहे.
-------
फोटो
पुणे-ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.१६) सफरचंदाची झालेली आवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

SCROLL FOR NEXT