पुणे

.

CD

काश्मिरी पंडितांची
सुरक्षा वाढवली

धमकीच्या पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना

श्रीनगर, ता. ११ : ‘लष्करे तय्यबा’ या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या ‘युनायटेड लिबरेशन कौन्सिल’ने (यूएलसी) दिलेल्या धमकीच्या पत्रावर काश्मिरी पंडित संघटनांनी सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या वसाहतींमधील सुरक्षा वाढवली असून, काश्मिरी पंडितांना काही काळ ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित मजुरांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर दहशतवादी संघटनेने हे धमकीचे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात सरकारी विभागात कार्यरत असलेल्या सहा काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. संबंधित दहशतवादी गटाने या सहा कर्मचाऱ्यांची नावे आणि फोन नंबर प्रसिद्ध केले असून, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आणि वास्तव्याच्या ठिकाणांची माहिती असल्याचा दावा केला आहे. या धमकीनंतर सुरक्षा दलांनी काश्मिरी पंडितांच्या वसाहतींमध्ये गस्त आणि पाळत वाढवली आहे.
‘ऑल मायग्रंट डिस्प्लेस्ड एम्प्लॉइज असोसिएशन काश्मीर’चे उपाध्यक्ष रंजन जोशी यांनी या धमकीबद्दल चिंता व्यक्त करून कडक सुरक्षेची मागणी केली आहे. सरकारने या यादीतील कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा द्यावी आणि खोऱ्यात कार्यरत असलेल्या प्रत्येक काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यासह त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT