Ring Sakal
पुणे

Katraj News : तीन महिन्याच्या बाळाच्या पोटातून काढली अंगठी; बाळाचा जीव वाचवण्यात यश

लहान मुलाला दागिने घालण्याची हौस प्रत्येकाला असते. घरात नवीन बाळाचा जन्म झाल्यावर प्रत्येक आई वडिलाना सोन्याचे दागिने गणकण्याची हौस असते.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कात्रज - लहान मुलाला दागिने घालण्याची हौस प्रत्येकाला असते. घरात नवीन बाळाचा जन्म झाल्यावर प्रत्येक आई वडिलाना सोन्याचे दागिने गणकण्याची हौस असते. अशाच एका बाळावर भारती हॉस्पिटल येथे तातडीने उपचार करून पुढील होणारा अनर्थ टाळण्यात डॉक्टर्स यशस्वी ठरले आहेत. तीन महिन्याच्या बाळाच्या पोटात गेलेली अंगठी काढण्यात भारती हॉस्पिटलच्या डॉ. दादासाहेब मैंदाड आणि त्यांच्या टीमने शस्त्रक्रिया न करता एन्डोस्कोपीव्दारे तोंडावाटे काढण्यात यश आले आहे.

भारती हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिने वयाच्या बाळाला बोटात सोन्याची अंगठी घातली होती. बालकांना आपली बोटे तोंडात घालून चघळण्याची सवय असते. असेच बोट चघळता चघळता अंगठी निघून पोटात गेली. ही बाब लगेचच आईच्या लक्षात आली. त्यांनंतर बाळाला तातडीने भारती हॉस्पिटल येथील एमर्जन्सी विभागात आणण्यात आले. सुदैवाने अंगठी अन्ननलिकेमध्ये अडकलेली नव्हती.

एक्सरे केल्यावर अंगठी जठरामध्ये असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे ऑपरेशन टाळून एन्डोस्कोपीव्दारा ही काढता येईल असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. त्यांनंतर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दादासाहेब मैंदाड यांनी लहान बाळावर एन्डोस्कोपी करण्यासाठी त्याला भूल देणे गरजेचे होते हे लक्षात घेऊन बाळाला भूल देण्याची जबाबदारी भूलतज्ञ डॉ. नेहा टिळक यांच्याकडे दिली. त्यानं ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

एन्डोस्कोपी थिएटरमध्ये घेतल्यानंतर लक्षात आले की बाळाला आईने नुकतेच दूध पाजले आहे. त्यामुळे लगेच अंगठी काढता येणार नव्हती. रात्री उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर एन्डोस्कोपीव्दारे यशस्वीपणे जठरामधील अंगठी काढण्यात आली. यावेळी सहाय्यक डॉक्टर म्हणून डॉ. कौशिक यांनी काम पाहिले. तर, सर्व टेक्निकल आणि नर्सिंग स्टाफने यावेळी मदत केली.

प्रतिक्रिया

अंगठी पोटात गेल्याचे लवकर लक्षात आले नसते तर बाळाचे जठर नाजूक असल्याने ते फाटण्याची शक्यता होती. या केसमध्ये ही बाब त्वरीत लक्षात आल्याने योग्य उपचार करता आले व पुढील धोका टळला. बाळ आता सुखरूप असून देखरेखीखाली ठेवले आहे.

- डॉ. दादासाहेब मैंदाड, भारती हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT