पुणे

सोनई

CD

‘कौतुकी’च्या स्वच्छता मोहिमेस
मंगळवारी प्रारंभ ः गडाख

सोनई, १० : ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचा वाढदिवस अगळ्या सामाजिक उपक्रमाने करण्याची परंपरा याहीवेळेस जपण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १२) सोनई येथील कौतुकी नदीची स्वच्छता व सुशोभीकरण कामाचा प्रारंभ संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
यापूर्वी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख व उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेतून व विविध सामाजिक संघटनांच्या सहभागातून मोरयाचिंचोरे गाव दत्तक योजना, गाव तेथे वाचनालय, गरजू मुलींचे शैक्षणिक पालकत्व, वर्षाच्या ३६५ दिवस वृक्षारोपण, साध्या पद्धतीने विवाह संकल्प व मरणोत्तर नेत्रदान आदी उपक्रम राबविण्यात आलेले आहे.
मागील आठवड्यात सोनई येथील यशवंत प्रतिष्ठान, आनंदवन परिवार, आर्ट ऑफ लिव्हिंग, संत निरंकारी, मारुती मंडळ, स्वामी समर्थ सेवेकरी व विविध संस्था व गणेश मंडळाने एकत्र येऊन ज्येष्ठ साहित्यिक गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकी नदी स्वच्छतेचा संकल्प केला होता. यशवंत प्रतिष्ठानने दहा लाख रुपयांची देणगी देऊन सुरुवात केली, तर अनेकांनी साधनसामग्री व डिझेलवर जेसीबी, पोकलेन व डंपर देण्याचे मान्य केले होते.

चौकट:
रामझिरा येथे संकल्पपूर्ती
येथील पुरातन रामझिरा प्रांगणात कौतुकी नदी स्वच्छतेचा संकल्पपूर्ती कार्यक्रम आयोजित केला असून, येथे होणारा हा सोहळा ग्रामस्थांसाठी कौतुकास्पद ठरणार आहे. नदीचे संवर्धन म्हणून वर्षभर देखभाल व विविध आपुलकी व्यक करणारे कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT