Pune Rain Raincoat Umbrella IMD Maharashtra  
पुणे

पुणेकरांनो, रेनकोट, छत्री बरोबर ठेवा! पुढील 4 दिवस पावसाची शक्यता

घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनो, मॉन्सून आता सक्रिय झाला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस तुम्ही घराबाहेर निघताना रेनकोट, जर्किन किंवा छत्री नक्कीच बरोबर ठेवा. कारण, पुढील चारही दिवस पावसाची शक्यता असून, घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

शहरातील सिंहगड रस्ता, पाषाण, कोथरूड, औंध, बाणेर भागात सकाळी सात वाजल्यापासून पावसाच्या जोरदार सरी पडल्या. मॉन्सूनच्या या रिमझीम सरी दुपारपर्यंत एकामागोमाग एक पडत होत्या. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेले निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेतच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहराला जोडणाऱ्या उपनगरांच्या रस्त्यांवर चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते.

शहरात दुपारपर्यंत पाऊस आणि त्यानंतर ढगाळ वातावरण त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ८.५ अंश सेल्सिअसने कमी होऊन २५.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. किमान तापमान २३.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली.

शहरात शिवाजीनगर येथील वेधशाळेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे दोन मिलिमीटर पाऊस पडला. शिवाजीनगर येथे १ जूनपासून आतापर्यंत ५०.३ मिलिमीटर पाऊस नोंदल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुण्यात पुढील चार दिवस हवामान ढगाळ राहणार असून, शनिवारपर्यंत (ता. १२) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर म्हणजे रविवारी (ता. १३) शहरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच दरम्यान घाट माथ्यावर काही भागात मुसळधार पाऊस पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT