खानदेशात दररोज दोन ते अडीच
हजार क्विंटल कापसाची आवक
शेतकऱ्यांकडील कापूससाठा अद्याप कमी
ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशातील सेंधवा, खरगोन आदी भागांत दररोज दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे. आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मागील वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला रोज तीन ते चार हजार क्विंटल कापसाची आवक होत होती. यंदा मात्र ही आवक कमी आहे. कारण यंदा कापूस लागवड घटली आहे. सध्या बागायती पट्ट्यात कापसाची आवक आहे. त्यात अलीकडेच कापूस वेचणी सुरू झाली आहे. यामुळे कापूस आवक कमी आहे. आवक कमी असल्याने दरात फारशी घट दिसत नसल्याचे चित्र आहे. पुढील १० ते ११ दिवसांनंतर कापसाची आवक वाढेल. नोव्हेंबरमध्ये आवकेत बऱ्यापैकी वाढ होईल. शेतकऱ्यांकडे कापूससाठा अल्प आहे.
राज्यात खानदेशसह अन्य भागात अद्यापही कापसाची आवक कमी असल्याने कापसाची खेडा खरेदी हवी तशी सुरू झालेली नाही. कापसाचे दर राज्यात किंवा देशात वेगवेगळे आहेत. खानदेशात सध्या दर्जेदार कापसाला प्रति क्विंटल १० हजार १०० रुपये व यापेक्षा अधिकचा दरही आहे.
चौकट ----
देशातही फटका
सध्या कापसाची आवक रखडत सुरू आहे. शेतकऱ्यांकडे कापूस अद्याप साठविण्यास सुरुवात झालेली नाही. यंदा कोरडवाहू कापसाचे उत्पादन एकरी २० किलो ते ३० किलो एवढेच येऊ शकते. तसेच कमी महाराष्ट्र, तेलंगणात कापसाची हानी झाली आहे. तेलंगणात उत्पादनात मोठी घट होऊ शकते, असेही संकेत आहेत. देशात एकूण २८० लाख गाठींचे उत्पादनही शक्य नाही, असेही सांगितले जात आहे. तर खानदेशातही काही जाणकारांच्या मते कापूसगाठींचे उत्पादन ११ ते १२ लाख गाठी एवढेच येईल. सध्या वेगवेगळे अंदाज कापूस गाठी उत्पादनाबाबत आहेत. परंतु डिसेंबरमध्ये यात बऱ्यापैकी स्पष्टता येईल, असे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.