insta.jpg 
पुणे

इंस्टाग्रामवर चॅटिंगचा बहाण्याने तरुणाचे अपहरण अन्‌ सुटका 

रविंद्र जगधने

पिंपरी : इंस्टाग्रामवर तरुणासोबत चॅटिंगचा बहाणा करून तरुणीसह अकरा जणांनी तरुणाचे अपहरण केले व सोनसाखळी काढून घेतली. पोलिसांनी 24 तासांत तरुणाची सुटका करून सात जणांना ताब्यात घेतले. 

हिंजवडी ते देहूरोडदरम्यान बुधवारी (ता. 12) रात्री ही घटना घडली. सूरज संजय कोळी (वय 22, रा. मातृछाया बिल्डिंग, आकुर्डी) असे सुटका केलेल्या तरुणाचे नाव आहे. अभिजित ऊर्फ गणेश पुरी (वय 20, रा. रुपीनगर), वैभव उपाडे (वय 18, रा. परिवर्तन सोसायटी, घरकुल, चिखली), ऋतिक जाधव (वय 18, रा. संभाजीनगर, चिखली), गणेश ऊर्फ बाळी चव्हाण (वय 18), आनंद वाल्मीकी (वय 23), बाळासाहेब रोकडे (वय 22), रवींद्र भवाळ (वय 22, तिघेही रा. काळाखडक, वाकड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आदित्य कोडगी, शुभम वाळके, बाळा लोखंडे व एका तरुणीचा शोध सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सूरज याच्या अपहरणाचा डाव आरोपींनी आखला. त्यासाठी एका तरुणीच्या इंस्टाग्रामवरून चॅटिंग करून सूरजला रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथे बोलाविले. तेथे त्याच्या दुचाकीला धक्का देऊन पाडल्यानंतर त्याची तीन तोळ्याची सोनसाखळी हिसकावली. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकीवरून त्याचे अपहरण केले. मात्र, ही बाब पोलिसांना कळताच नाकाबंदीत त्याची देहूरोडमध्ये गुरुवारी (ता. 13) पहाटे साडेतीनच्या सुमारास सुटका करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

ना कोणता आजार, ना प्रकृतीची तक्रार! गरबा खेळताना ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू; छातीत अचानक कळ आली अन्...

Dussehra 2026: दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात? राजा रघु आणि कुबेराची ही पौराणिक कथा जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : नारायण गडावरील मनोज जरांगेंच्या मेळाव्याला तुफान गर्दी; विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर?

SCROLL FOR NEXT