Kinnow orange season begins 
पुणे

पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड(पुणे) : रंगाने पिवळे तांबडे, दिसायला आकर्षक, चवीला आंबट गोड असणाऱ्या किन्नू संत्र्यांची मार्केट यार्डात आवक सुरू झाली आहे. बाजारात या फळाला किन्नू संत्री असे म्हटले जाते. राजस्थान मधून या किन्नू संत्र्यांची आवक सध्या फळ बाजारात सुरू झाली आहे. दहा किलोच्या एका पेटीला घाऊक बाजारात दर्जानुसार २८० ते ५०० रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात एका किलोला दर्जानुसार ६० ते ८० रुपये भाव मिळत आहे.

मोसंबीला अच्छे दिन;एक मोसंबी तब्बल २६ रुपयांना

किन्नू संत्रीची सध्या बाजारात दररोज २५ ते ३० टन इतकी आवक होत आहे. एक बॉक्स दहा किलोचा असतो. दर्जानुसार घाऊक बाजारात २८० ते ५०० रुपये एवढा भाव आहे. पुढील काही दिवसात किन्नू संत्रीची आवक वाढेल. बाजारात विक्रीसाठी दाखल होणाऱ्या किन्नू संत्र्याला ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे व्यापारी आरिफ शेख यांनी सांगितले.

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत १३ हजार वाहनचालकांवर कारवाई

या फळाला पुणे शहर, पिंपरी चिंचवड, बारामती, इंदापूर, लोणावळा, कोकण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, पेण, पनवेल आदी भागांतून मोठी मागणी आहे. यंदा पोषक हवामानामुळे किन्नू संत्रीचे उत्पादन चांगले असून आकार आणि गोडी चांगली आहे. हे फळ दिसायलाही आकर्षक असल्याने त्यास शहरासह इतर जिल्ह्यातून चांगली मागणी आहे. किरकोळ ग्राहक, फळविक्रेते तसेच ज्यूस विक्रेत्यांकडूनही किन्नू संत्र्याला चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हे काय! पैशांअभावी बसथांब्यावरच झाली प्रसूती

किन्नू संत्र्यांची सर्वाधिक लागवड राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यात शेतकरी करतात. त्या खालोखाल पंजाबमध्ये किन्नू संत्र्यांची लागवड केली जाते. किन्नू फळ हे संत्री आणि मोसंबीचा संकर आहे. डिसेंबर महिन्यात किन्नू संत्र्यांची आवक सुरू होते. किन्नू संत्र्यांचा हंगाम साधारणपणे मार्चपर्यंत सुरू असतो.
- अरविंद मोरे, फळ व्यापारी, मार्केट यार्ड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : व्यावसायिक गॅसचा फटका शिवभोजन थाळीला; एक दिवस पुरेल इतकाच व्यावसायिक सिलेंडर; दरही वाढले

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT