पुणे

सोमय्या पुन्हा पुणे पालिकेत जाणार; त्याच पायऱ्यांवर भाजपतर्फे सत्कार

किरीट सोमय्या यांना पुणे महानगर पालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती.

सुधीर काकडे

भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आज पुन्हा पुणे महानगर पालिकेत (Pune Municipal Corporation) येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुणे महानगरपालिकेत आल्यानंतर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. यावेळी ते खाली पडल्याने त्यांच्या हाताला जखम झाली होती. त्यानंतर आज भाजपकडून त्यांचा त्याच ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आज सकाळपासूनच पुणे महानगरपालिका परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे.

पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामातील भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं होतं. सोमय्या यांना घेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांना त्यांच्या सुरक्षारक्षकांकडून रोखताना जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामध्ये सोमय्या पायरीवरून खाली पडल्याने जखमी झाले होते. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल केलं होतं. या घटनेचे पुण्यात राजकीय पडसाद उमटले असून, भाजपने तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यानंतर आज भाजपकडून पुणे महानगरपालिकेत सोमय्यांचा सत्कार होणार आहे.

दरम्यान, याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाटलांनी पत्रात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT