KOE26B01026
कोळा ः विद्यामंदिरचा विद्यार्थी तन्मय देशमुख यांने 98 टक्के गुण मिळवल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, सोबत शिक्षक स्टाफ व ग्रामस्थ.
कोळा विद्यामंदिर हायस्कूलचे घवघवीत यश
कोळा : सांगोला तालुक्यातील कोळा विद्यामंदिर हायस्कूलने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मराठी व सेमी माध्यमातून उत्कृष्ट निकाल नोंदवत विद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यंदा विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.
विद्यालयातून एकूण २२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सेमी माध्यमातील ७६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत सेमी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सेमी माध्यमातून तन्मय उदय देशमुख याने ५०० पैकी ४९० गुण (९८ टक्के) मिळवत विद्यालयात तसेच केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ऋतिका ब्रह्मदेव आलदर हिने ५०० पैकी ४७० गुण (९४ टक्के) मिळवत द्वितीय, तर सृष्टी राजेंद्र देशमुख हिने ५०० पैकी ४६२ गुण (९२.४० टक्के) मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
मराठी माध्यमातून मेघा गिरजाप्पा सरगर हिने ५०० पैकी ४६२ गुण (९२.४० टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वाती साऊबा आलदर हिने ५०० पैकी ४३९ गुण (८७.८० टक्के) मिळवत द्वितीय, तर प्रियंका हणमंत कोळेकर हिने ५०० पैकी ४३८ गुण (८७.६० टक्के) मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. तसेच ओम तानाजी मदने याने ९१.८० टक्के, तर समीक्षा गणपत कोळेकर हिने ९० टक्के गुण मिळविले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.