पुणे

चौकशीसाठी मुदत कमी

CD

कोलकता, ता. २२ (पीटीआय) : ‘‘कोलकात्यातील दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी तीन महिने ही मुदत खूप कमी आहे. तरीही आम्ही निर्धारित वेळेत अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करू,’’ असे विशेष तपास पथकाच्या प्रमुख निवृत्त न्यायाधीश अनिंदिता रॉय सरस्वती यांनी गुरुवारी सांगितले.
उत्तर कोलकात्यातील चोरबागान दुर्गापूजा मंडपात १७ ऑक्टोबरला झालेल्या चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. या घटनेची कारणे शोधण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्याच्या उपाययोजना सुचविण्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने सहा सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. चौकशीचा आराखडा निश्चित करण्यासाठी पथकाची लवकरच बैठक होणार असून, घटनास्थळाची पाहणीही केली जाणार आहे, असे सरस्वती यांनी सांगितले.

या मुद्यांची करणार तपासणी
- चेंगराचेंगरीपूर्वी गर्दी अचानक वाढण्याची कारणे काय
- घटनास्थळी उपस्थित लोकांची संख्या आणि सुरक्षित क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाली होती का
- घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण, मोबाइलवरील व्हिडिओ, न्यायवैद्यक अहवाल, दूरध्वनी नोंदी, पोलिस ठाणे आणि नियंत्रण कक्षातील नोंदी तसेच वैद्यकीय पुरावे तपासणार
- आयोजक, पोलिस, खासगी सुरक्षा कर्मचारी, स्वयंसेवक, रुग्णवाहिका सेवा, रुग्णालये, अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासन यांच्या तयारीची व प्रतिसादाचीही चौकशी होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: अमेरिकेत घोंघावतेय 'निळे वादळ'? राजकारणात मोठी उलथापालथ होणार

IND vs NZ 1st T20I: क्रिकेटपटू फुटबॉलचा सराव का करतात? अर्शदीप सिंगने घेतलेली विकेट पाहून मिळेल उत्तर... Video Viral

लाँच होण्याआधी मर्सिडिजच्या इलेक्ट्रिक कारचा अपघात, 'पॅरिस मोटार शो' मध्ये मुलांनी अचानक सुरू केली अन्... Video Viral

सेट नाही खरा आहे 'दृश्यम'च्या विजय साळगावकरचा बंगला; ८५ वर्षीय महिला करतेय देखभाल, तुम्हाला पाहायचाय? हा घ्या पत्ता

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

SCROLL FOR NEXT