पुणे

.

CD

कृष्णजन्मभूमीसाठी
सहा डिसेंबरला कारसेवा

मथुरेतील चित्रगुप्त पीठाकडून घोषणा

मथुरा, ता. ९ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिराच्या निर्मितीसाठी रविवारी चित्रगुप्त पीठावरून मोठी घोषणा करण्यात आली. साधुसंतांच्या उपस्थितीत मंदिर उभारणीचा संकल्प पुन्हा दृढ करून सहा डिसेंबर २०२६ रोजी कारसेवा आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या कारसेवेत देशभरातून मोठ्या संख्येने साधुसंत आणि भाविक सहभागी होतील, असा दावा विविध धार्मिक संघटनांनी केला आहे.
चित्रगुप्त पीठावर झालेल्या बैठकीत उपस्थित साधुसंतांनी श्रीकृष्ण जन्मस्थानाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांवरही चर्चा केली. ‘वक्फ’ कायदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली; तसेच मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाशी संबंधित प्रलंबित खटल्यांच्या जलद निकालासाठी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणांची दररोज सुनावणी व्हावी, जेणेकरून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादांचा लवकर न्यायालयीन तोडगा निघेल, असे साधूंचे म्हणणे आहे.

व्यापक तयारीची घोषणा

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साधू आणि भाविक उपस्थित होते. कारसेवेची घोषणा झाल्यानंतर उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सहा डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी देशभरात व्यापक स्तरावर तयारी केली जाईल आणि विविध भागांतील संतांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येईल, असे संतांनी सांगितले.

धार्मिक परंपरांवर प्रशासनाची बंदी
कृष्णजन्मभूमी परिसरात मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित ‘शंखनाद’ आणि कारसेवेपूर्वी मथुरा जिल्हा प्रशासनाने गोवर्धन परिसरात नव्या धार्मिक परंपरा सुरू करण्यास आणि बेकायदा हालचालींना बंदी घातली आहे. ही कारवाई सर्वोच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहर पोलिस अधीक्षक राजीवकुमार सिंह यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे, जिल्ह्यात कोणतीही नवी परंपरा सुरू करण्यास सक्त मनाई असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT