पुणे

कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा

CD

लोगो ः बोल संतांचे
अभय महाराज जगताप

कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा

ज्येष्ठ बंधू असलेले निवृत्तीनाथ महाराज हेच ज्ञानदेव, सोपानदेव व मुक्ताबाई यांचे गुरू सुद्धा होते. आदिनाथ शंकर-मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तीनाथ अशी ही गुरूपरंपरा आहे. गहिनीनाथ हेच सोपानदेवांच्या आजी आजोबांचे म्हणजेच गोविंदपंत व निराई यांचेही गुरू होते. गहिनीनाथांकडून प्राप्त झालेल्या अनुग्रहाचे वर्णन निवृत्तीनाथांच्या काही अभंगांमध्ये आले आहे.
निवृत्ती गयनी कृपा केली पूर्ण ।
कुळ हे पावन कृष्णनामे ।।
गहिनीनाथांनी आपल्यावर कृपा केली व कुळाला पावन करणारे कृष्णनाम दिले असा याचा अर्थ आहे.
हा कृष्णनामाचा उपदेश निवृत्ती नाथांकडून सोपानदेवांकडे आला आहे. ज्ञानदेवादि भावंडांची भक्ती फक्त कृष्णनामाची नसून कृष्णाने केलेला उपदेश सुद्धा त्यांनी शिरोधार्य मानला आहे. तेराव्या शतकाचा काळ हा सर्वच दृष्टीने धामधुमीचा काळ होता. धर्माचा खरा अर्थ लोप पाहून कर्मकांड व जातीभेदाच्या नियमांना महत्त्व आले होते. उत्तरेकडे परकीयांचे आक्रमण होऊन ते आता महाराष्ट्राकडे सरकत होते. युद्ध नको म्हणणाऱ्या अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली होती. सोपान काळात भगवद्‍गीतेत कृष्णाने अर्जुनाला केलेला लढण्याचा उपदेश पुन्हा जागवण्याची गरज होती.
त्यासाठी या भावंडांनी भगवद्गीतेचा पुरस्कार केला. ज्ञानदेवांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ हा भगवद्‍गीतेवरचे भाष्य तर सोपानदेवी हा ग्रंथ भगवद्‍गीतेचा समश्‍लोकी मराठी अनुवाद आहे. या दोन्ही ग्रंथांनी भगवद्‍गीतेचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. यातून कृष्णाने अर्जुनाला सांगितलेला मार्गच मराठीमध्ये, प्राकृत भाषेमध्ये प्रगट केला आहे.
गोकुळातला कृष्ण पंढरपुरात पांडुरंग रूपाने उभा आहे. सोपानदेवांच्या दृष्टीने त्याची भक्ती करायची म्हणजे त्याने दाखवलेल्या मार्गाने चालायचे. कृष्णाने दाखवलेला मार्ग म्हणजे भगवद्‍गीतेचा मार्ग. भगवान कृष्णाने दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा विचार संत सोपानदेवांनी एका अभंगात व्यक्त केला आहे.
कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा ।
तव मार्ग येसरा तुजमाजी ।।
मी कृष्णाच्या मार्गाने चाललो आहे. हा मार्ग तुझ्यामध्ये म्हणजे पांडुरंगामध्येच येऊन मिळतो. इथे त्यांनी कृष्ण व विठ्ठलामधील अभेदत्व सांगितले आहे. पंथ म्हणजे मार्ग, रस्ता व संप्रदाय.
आदि ब्रह्ममूर्ति तूचि विष्णु स्थिती ।
तुज कैवल्यपती मोल नाही ।।
तूच सर्व जगाचे आरंभ स्थान आहेस, तूच परब्रह्म आहे, तूच विष्णू आहेस.
अमोल्य जे वस्तु पुंडलिक देवा ।
जगाचा विसावा जनकु माझा ॥
असा हा परमात्मा पुंडलिकामुळे पंढरपूरला आलेला आहे. हा पांडुरंग सर्व जगाचा विसावा आहे. आमचा मायबाप आहे.
सोपान म्हणे साकडे तुजचि सर्व कोडे ।
विनवितु मी वाडे चरणापाशी ॥
एकदा या कृष्णाच्या मार्गाने चालायला सुरुवात केली की आपला सर्व भार त्या कृष्णाकडेच जातो.
इतर अभंगांमध्येही सोपानदेव कृष्णार्जुन संवादाची म्हणजेच गीतेची साक्ष काढतात. या विश्वामध्ये सर्व देह, सर्व सृष्टीमध्ये परमात्माच नटलेला आहे हे सांगताना, हा उपदेश कृष्णाने अर्जुनाला केलेला आहे असे ते आवर्जून सांगतात.
हा बोधु श्रीरंगी अर्जुना उपदेशु ।
सर्व हृषिकेशु सर्वा रुपी ।।
हरी शिवाय वेदादिकांना मती नाही असे म्हणणारे सोपानदेव आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी भगवद्‍गीतेचे प्रमाण घेतात. यावरून त्यांनी भगवद्‍गीतेला किती महत्त्व दिले आहे लक्षात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Nutritious Diet : शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त अन्नधान्य येत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप; काळवाडी ग्रामस्थांचा पोषण आहारावर बहिष्कार

झुरळ पाहून श्वेता तिवारी घाबरली! म्हणाली, ‘तुकाराम मुंढे जी, तुम्ही कुठे आहात?’ Viral Video

Marathi News Live Updates : दिल्ली विद्यापीठाने चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थेट पीएचडी प्रवेशाची सुविधा जाहीर केली

Baramati Accident : बारामतीनजिक हायवाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी...

Nirgudsar News : व्हिडिओ चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास मारहाण

SCROLL FOR NEXT