कुरनूर धरणात
२४ टक्केच पाणीसाठा
दररोज १.५ दशलक्ष घनफूट पाण्याची गरज
ॲग्रोवन वृत्तसेवा
अक्कलकोट, जि. सोलापूर : अक्कलकोट शहर, समर्थनगर आणि अन्य सात ते आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या कुरनूर धरणात ११ ऑक्टोबरअखेर केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात सध्या १९७ दशलक्ष घनफूट पाणी असून, दररोज सुमारे १.५ दशलक्ष घनफूट पाण्याची गरज भासत आहे. एकरूख उपसा सिंचन योजनेतून धरणात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आल्यामुळे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा पावसाळ्याचा हंगाम संपत आला तरी पावसाने दडी मारल्याने दरवर्षी भरणारे कुरनूर धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरले नाही. पाणीपुरवठा योजना आणि जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी एकरूख उपसा सिंचन योजनेतून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात आले होते, ज्यामुळे धरणातील पाणीसाठा टिकून राहण्यास मदत झाली. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणाला दिलासा मिळू शकला नाही. आता एकरूख योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे धरणातील उपलब्ध १९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करावा लागणार आहे. पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, एकरूख योजनेचे तीनही पंप सुरू करून ७० ते ९० क्युसेक पाणी २४ तास सोडल्यास धरणातील साठ्यात किमान सात दशलक्ष घनफूट वाढ अपेक्षित होती. प्रत्यक्षात धरणातील पाणीसाठा दररोज सरासरी २.५ दशलक्ष घनफुटाने वाढल्याचे दिसून आले, जो सुमारे २५ ते ३० क्युसेक प्रवाहाएवढा ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.