पुणे

व्याहळी- वीट मिटर बॉक्स

CD

कुसगावमध्ये विजेचा बॉक्स
बसविल्याने समाधान
व्याहळी, ता. १८ : कुसगाव (ता. वाई) येथील विजेच्या वितरण बॉक्सला काल आग लागली होती. त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासांत नवीन बॉक्स बसवून गावातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
काल सकाळी विजेच्या बॉक्समधून अचानक आगीच्या ज्वाला निघू लागल्या. हा प्रकार ग्रामस्थ नारायण वरे व किरण बगाडे यांनी तातडीने महावितरणच्या व्याहाळी शाखेचे शाखाधिकारी सागर मगदूम यांना माहिती दिली. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, म्हणून शाखाधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित भागाचा वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. बॉक्स जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शाखाधिकारी मगदूम, कर्मचारी अमर महागडे, अजित ननवरे, तुषार जगताप आणि गुंजन शेंडे यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. तातडीने नवीन बॉक्स उपलब्ध करून तो बसविण्यात आला. महावितरणच्या तत्पर कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बॉक्स इतरत्र हलवणे गरजेचे आहे. यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामपंचायतीला कळवले असून, जागा मिळताच स्थलांतराचा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल, असे शाखाधिकारी मगदूम यांनी सांगितले.


फोटो
PNE26W19933

कुसगाव ः नवीन बसवलेला वीज वितरणाचा बॉक्स.

--- प्रशांत थोरवे -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave Deaths : विदर्भात उष्णतेची भयंकर लाट ! नागपुरात उष्माघाताने एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना इशारा

Aurangabad Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला! लिंबेजळगावजवळ भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, महामार्गावर मृत्यूचा थरार..

Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेलच्या दरांत 4 दिवसांत दोनदा दरवाढ! काय आहे आजचे नवे दर?

Ratnagiri Blast: Ratnagiri सरपण गोळा करताना अनोळखी वस्तू दिसली, कुतुहलाने उचलताच झाला स्फोट; महिलेच्या हाताची बोटे तुटली

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

SCROLL FOR NEXT