पुणे

ओंकार उद्योग समूहाची बदनामी केल्याने गुन्हा

CD

इंदापूर, ता. १३ : समाज माध्यमांतून खोटी, दिशाभूल करणारी व मानहानिकारक माहिती प्रसारित करून ओंकार उद्योग समूह व संबंधित साखर कारखान्यांची बदनामी केल्याप्रकरणी रविराज साबळे पाटील (रा. भूम, ता. परांडा, जि. धाराशीव) यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रणजीत बापूराव तावरे (वय ५०, जनरल मॅनेजर, आकार शुगर कारखाना युनिट नं. ११, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना, बिजवडी, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रविराज साबळे पाटील याने त्याच्या समाज माध्यमांवरील खात्यांवरून २९ एप्रिल रोजी एक व्हिडिओ प्रसारित केला. त्यामध्ये ओंकार उद्योग समूह व बाबूराव बोत्रे पाटील यांच्या संदर्भात खोटी, अप्रमाणित, दिशाभूल करणारी व चिथावणीखोर विधाने केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. तसेच, ओंकार उद्योग समूहाच्या १७ युनिटबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवून जनमानसात अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. संबंधित व्हिडिओद्वारे कारखान्यांची प्रतिमा मलिन करून आर्थिक व सामाजिक नुकसान करण्याचा हेतू असल्याचा आरोपही केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Boisar MIDC Fire: बोईसर एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट, अनेक कामगार जखमी झाल्याची भीती; Video Viral

Pune Police Misconduct : रक्षकच बनला भक्षक! पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील चाळे; हवालदार निलंबित

Maharashtra Doctor Recruitment : राज्यात 1400 डॉक्टरांच्या आठवडाभरात नियुक्त्या, आणखी 600 डॉक्टरांची होणार भरती; आरोग्यमंत्री आबिटकरांची मोठी घोषणा

Marathi News Live Updates : रस्त्यांवरील खड्ड्यांवरून ठाकरे सेनेचे नाशिकमध्ये आंदोलन; संजय राऊतांसह कार्यकर्ते आक्रमक

Prithviraj Chavan: कऱ्हाड दक्षिणच्या मतदार यादीत ५६ हजार संशयित दुबार नोंदी कशा? पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासनाला घेरले, ‘ती’ राजकीय चूक झाली..

SCROLL FOR NEXT