पोलिस कोठडी 
पुणे

लष्कर भरती पेपर फुटी प्रकरणी लेफ्टनंट कर्नलला कोठडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात लेफ्टनंट कर्नलला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी दिला आहे.(Lieutenant Colonel In police Custody in Army recruitment paper rupture case)

भगत प्रितसिंग सरताजसिंग बेदी (वय ४४, रा. सिकंदराबाद, आंध्रप्रदेश, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्याची व्याप्ती महाराष्ट्रसह इतर राज्यात पसरली आहे. तो लेखी परीक्षेचा प्रिंटींग कमिटीचा प्रिसायडिंग ऑफीसर होता. त्याने आरोपींना इंग्रजी हस्तलिखित ५० प्रश्न व पर्याय असलेली प्रश्नपत्रिका पाठवली होती. ती प्रश्नपत्रिका सिकंदराबाद येथील त्याच्या घरातून जप्त केली आहे.

मोबाईलमध्येही या प्रश्नपत्रिकेचे फोटो त्याने काढले होते. ते फोटो पत्नीच्या मोबाईलमध्ये ठेवले होते. या अनुषंगाने पत्नीचा गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा तपास करायचा आहे. त्याला या प्रकरणात तीन लाख रुपये मिळाले होते. त्यापैकी दीड लाख रुपये त्याने काढून दिले असून, उर्वरित रक्कमेचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांचं वजन ९ किलो घटलं, उपोषणाचे अवयवांवर गंभीर परिणाम; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिला इशारा

Pandharpur VIP Darshan : पहिल्याच दिवशी VIP दर्शन बंदीचा फज्जा! मुनगंटीवारांना ठेवलं वेटिंगवर, गुलाबराव पाटलांना दिलं तात्काळ दर्शन; महायुतीच्या नेत्यांमध्येच दुजाभाव?

Latest Marathi News Live Update : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतल्यास गुन्हा दाखल करणार

डॉक्टर पतीला संपवलं, ८ वर्षांचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात; शेजारी डॉक्टर पत्नी मोबाईल बघत बसलेली

'आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला' उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT