पुणे

कार्टूनिस्टस् कंबाइन संस्थेचा लहू काळे यांना जीवनगौरव

CD

कार्टूनिस्ट्‍स कंबाइन संस्थेचा
लहू काळे यांना जीवनगौरव

पुणे : कार्टूनिस्ट्‍स कंबाइन संस्थेचा व्यंग्यचित्रकलेतील मानाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार लहू काळे यांना जाहीर झाला आहे. काळे हे गेल्या २० वर्षांपासून ‘दैनिक ॲग्रोवन’मध्ये केवळ शेतकरी या विषयावर आधारित ‘चकाट्या’ हे पॉकेट कार्टून रेखाटत आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गौरव सर्जेराव यांनी दिली.
संस्थेच्या वतीने अखिल भारतीय मराठी व्यंग्यचित्रकार संमेलन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते विजयादशमीनिमित्त मुंबईतील शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
या वेळी अभिनेत्री चिन्मयी सुमित, कार्टूनिस्ट्‍स कंबाइन संस्थेचे अध्यक्ष गौरव सर्जेराव, सचिव धनराज गरड, उपाध्यक्ष अमित पापळ, उदय मोहिते, वासुदेव बोंद्रे, नीरज सबनीस, ओंकार बागवे, जयेश दळवी आदी उपस्थित होते.
हे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २०२६ या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. संमेलनात व्यंग्यचित्र कार्यशाळा, देशभरातील मराठी व्यंग्यचित्रकारांची प्रात्यक्षिके, परिसंवाद, व्यंग्यचित्र दिंडी आणि पुरस्कार सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचा लोगो तरुण व्यंग्यचित्रकार वासुदेव बोंद्रे यांनी साकारला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारे हे संमेलन बाळासाहेब ठाकरे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्यंग्यचित्रकार मारिओ मिरांडा यांना समर्पित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ : २२६ धावांचं लक्ष्य, शेवटच्या षटकात थरार; संजू सॅमसनच्या फटकेबाजीनंतर नमन धीरचा धमाका, न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

Deepinder Goyal: तुमच्या मनातलं गुपीत एआयला सांगा, कंपनीलाही वाचता येणार नाहीत तुमच्या चॅट्स! AIच्या मार्केटमध्ये आता 'झोमॅटो'ची एन्ट्री

Latest Marathi News Live Update : हुती बंडखोरांचा सौदीतील दम्माम विमानतळावर हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Pune Prison Police Recruitment : पुणे कारागृह पोलिस भरती रखडली; इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुण्याची प्रक्रिया संथ; उमेदवारांमध्ये नाराजी

Kondhwa News : कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

SCROLL FOR NEXT