पुणे

मोटारीवरील चुंबने पडली महागात

CD

मोटारीवरील प्रेयसीच्या
‘लिपस्टिक खुणां’मुळे भुर्दंड!

पोलिसांनी मालकास ठोठावला साडेपाच हजारांचा दंड

ग्वाल्हेर, ता. २५ (पीटीआय): समाजमाध्यमांत लक्षवेधी ठरण्यासाठी केलेला ‘स्टंट’ ग्वाल्हेरच्या एका व्यक्तीला महागात पडला. त्याच्या प्रेयसीने त्याच्या मोटारीवर तब्बल ३४०० चुंबने घेऊन त्यावर आपल्या ‘लिपस्टिक’च्या खुणा उमटवल्या. या खुणांनी अवघी मोटार व्यापून गेली. मात्र, त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला साडेपाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

‘लिपस्टिक मार्क’ने व्यापलेली ही मोटार दोन दिवस शहरातील रस्त्यांवर फिरत असल्याची समाजमाध्यमावरून सर्वदूर प्रसारित (व्हायरल) झाली आहेत. याची दखल घेऊन पोलिसांनी मोटारीच्या बाह्यरुपात अवैध बदल केल्याबद्दल संबंधित व्यक्तीस हा दंड ठोठावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अभिषेक रघुवंशी यांनी दिली. त्यांनी सांगितले, की शहराच्या मध्यवर्ती भागातून ही मोटार फिरत असल्याची चित्रफीत दोन दिवसापूर्वी ‘व्हायरल’ झाली. पोलिसांनी तपास केला असता ही मोटार ग्वाल्हेरमधील थाटीपूर भागातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या मोटारमालकास ताब्यात घेऊन पोलिसठाण्यात नेले व मोटार वाहन कायद्यानुसार त्याला साडेपाच हजारांचा दंड ठोठावला. तसेच पोलिसांनी लिपस्टिकच्या या खुणा हटवून ही मोटार साफ करण्यास मोटारमालकास भाग पाडले.
----------

‘फॉरिन ट्रेंड’चे अनुकरण

या मोटारीचे मालक आदित्य सिकरवार यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांच्या मैत्रिणीने एका परदेशांत प्रचलित प्रकाराचे (फॉरिन ट्रेंड) अनुकरण करत ही मोटार सजवली होती. ते म्हणाले, ‘‘तिने या मोटारीवर सर्वत्र ३,४०० ‘लिपस्टिक’चे डाग उमटवण्यासाठी सुमारे साडेतीन तास काम केले आणि त्यानंतर त्याचा ‘व्हिडिओ’ समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केला. हे कृत्य बेकायदेशीर आहे याची मला कल्पना नव्हती; त्यामुळे पोलिसांच्या कारवाईनंतर मी गाडीवरील ‘लिपस्टिक’चे डाग काढून टाकण्यासाठी संपूर्ण मोटार स्वच्छ केली आणि साडेपाच हजार रुपयांचा दंड भरला. कायद्याचे उल्लंघन होईल असे कृत्य कुणीही कधीही करू नये, असेच माझेही मत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT