पुणे

संमेलन

CD

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा खर्च जाहीर करा

डॉ. भारत पाटणकर; विद्रोही साहित्य संमेलन जमाखर्च संयोजन समिती

सातारा, ता. १६ : येथे मे महिन्यात झालेल्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने संमेलनाचा जमा खर्च जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वी साताऱ्यातच झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जमा खर्च जाहीर करावा, अशी मागणी डॉ. भारत पाटणकर व कॉ. धनाजी गुरव यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने केली आहे.

विद्रोही साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने जमा खर्च संयोजन समिती व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या वतीने झालेल्या बैठकीत जमा खर्च जाहीर करण्यात आला आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे मार्गदर्शक, मंडळाचे सदस्य डॉ. भारत पाटणकर व संघटनेचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा जमा खर्च संयोजन समितीच्या वतीने खजिनदार राहुल गंगावणे यांनी सादर केला.
यावेळी समितीचे सचिव ॲड. राजेंद्र गलांडे, सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद, डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रा. गौतम काटकर, प्रदीप मोरे, हणमंत सावंत, दिलीप भोसले, शिवाजी भोसले, शुभम ढाले, संकेत माने, अमित कांबळे, अस्तिका आगासे, प्रा. हरी पाटील, संतोष गोठल आदी उपस्थित होते. संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले.
...........

चौकट

१६ लाख पाच हजार २६४ रुपये खर्च

विद्रोही संमेलनासाठी १६ लाख ८४ हजार ९३८ रुपये निधी जमा झाला असून, १६ लाख पाच हजार २६४ खर्च झाला आहे. यामध्ये ७९ हजार ६७४ रुपये शिल्लक राहिल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
............

फोटो- भारत पाटणकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT