pune airport 
पुणे

पुण्यातलं विमानतळ होणार 'क्वारंटाइन'; प्रवाशांना केलं आवाहन

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यातील लोहगाव विमानतळ प्रशासनाने एप्रिल आणि मे महिन्यात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. या दोन्ही महिन्यात धावपट्टीच्या पुर्नरचना करण्यात येणार असल्यानं विमानसेवा काही काळ बंद राहणार आहे. विमानतळ प्रशासनाने सांगितलं की, धावपट्टीची पुर्नरचना करण्यात येणार असल्यामुळे लोहगाव विमानतळावरील वाहतूक एप्रिल आणि मे महिन्यात 14 दिवसांसाठी बंद राहणार आहे. त्याची दखल घेवून प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीची पुर्नरचना करण्याचे काम अनेक वर्षे प्रलंबित होते. त्याला गेल्यावर्षी 26 ऑक्‍टोबर रोजी मुहूर्त मिळाला आहे. तेव्हापासून सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यानच विमान वाहतूक सुरू आहे. सुमारे एक वर्ष हे काम चालेल, असे लोहगाव विमानतळ प्रशासनाने या पूर्वीच स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर लोहगाव विमानतळावरील वाहतूक आता 26 एप्रिल ते 9 दरम्यान पूर्णतः बंद राहणार आहे. 10 मे पासून सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान विमान वाहतूक सुरू होईल.

लोहगाव विमानतळ हवाई दलातर्फे संचलीत होतो. धावपट्टीच्या पुर्नरचनेच्या कामामुळे एप्रिल- मे मध्ये 14 दिवस विमान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, असे हवाई दलाने कळविले आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळ प्रशासनाने ट्‌विटरद्वारे या बाबतची माहिती रविवारी प्रवाशांना दिली.

विमानतळावरून सध्या सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान सध्या सुमारे 40 विमानांची दररोज वाहतूक होत आहे. एप्रिल- मे मध्ये 14 दिवस विमान वाहतूक बंद राहणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे दिलेल्या पूर्वसूचनेनुसार प्रवाशांनी नियोजन करावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT