छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकअदालतमध्ये
१५२४ प्रकरणे तडजोडीने निकाली
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने शनिवारी (ता. ९) आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतमध्ये प्रलंबित व वादपूर्व असे एकूण १५२४ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. याद्वारे २३ कोटी ३२ लक्ष ७२ हजार ४०५ रुपये रकमेचा समावेश असलेली प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी कळविले आहे.
प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार (ता. ९) रोजी करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन करण्यात आले. त्यात विविध शासकीय विभाग, वीज कंपनी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी आदींनी सहभाग घेतला.या लोकअदालतीत १४७१ प्रलंबित व ५३ दाखलपूर्व असे एकूण १५२४ प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्यात प्रलंबित प्रकरणांमध्ये २२ कोटी ३६ हजार ३४० रुपये रक्कम वसुली झाली. तर दाखलपूर्व प्रकरणांमध्ये १ कोटी ३२ लाख ३६ हजार ६५ रुपये असे एकूण २३ कोटी ३२ लाख ७२ हजार ४०५ रुपये एवढ्या रकमेचा समावेश असलेली प्रकरणे निकाली निघाली. राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्ह्यात एकूण ३४ पॅनल तयार करण्यात आले होते,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती वैशाली फडणीस यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.