Old Women sakal
पुणे

Pune Loksabha Election : ऑक्सिजन सिलेंडरसह आजी मतदानाला

श्‍वसनाच्या त्रासामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह मतदान केंद्रावर येऊन आजींनी त्यांचा हक्क बजावत लोकशाहीतील कर्तव्य पार पाडले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - श्‍वसनाच्या त्रासामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह मतदान केंद्रावर येऊन आजींनी त्यांचा हक्क बजावत लोकशाहीतील कर्तव्य पार पाडले. वेदा भावे असे या आजीचे नाव आहे. त्यांना श्‍वसनाचा त्रास असल्याने श्‍वासोश्‍वास व्यवस्थित सुरु राहावा यासाठी डॉक्टरांनी ऑक्सिजन लावण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार त्या घरात तसेच बाहेर जाताना ऑक्सिजन सिलेंडर सोबत घ्यावा लागतो.

आज सकाळी कोथरूड येथील मीनाताई ठाकरे शाळेतील मतदान केंद्रावर वेदा भावे या मुलासोबत मतदान करण्यासाठी आल्या होत्या. त्यांना प्राधान्याने मतदान करण्याची संधीही यावेळी देण्यात आली.

वेदा भावे म्हणाल्या, ‘कबुतरांमुळे मला श्‍वसनाचा त्रास सुरु झाला. गेल्या अनेक वर्षापासून मला ऑक्सिजनची आवश्‍यकता भासत आहे. मतदान हा आपला हक्क असून, तो बजावलाच पाहिजे. मी पुढच्या मतदानासाठी असेन नसेन पण यावेळी हा हक्क बजावण्यासाठी मुलासोबत मतदानासाठी आले आहे. आपला नेता आपणच निवडला पाहिजे, मतदान केले तरच आपल्याला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करणे आवश्‍यक आहे.

तीन महिन्याच्या बाळासह मतदान

रावेत येथे राहणाऱ्या भावना जोशी यांनी त्यांच्या तीन महिन्याचा बाळासह कोथरूड येथील महेश विद्यालय येथील मतदान केंद्रात मतदान केले. भावना जोशी म्हणाल्या, २०१४, २०१९ प्रमाणे यंदाही मतदान केले आहे. आपल्याला चांगले सरकार हवे असले तर मतदान केले पाहिजे, आपले एक मत परिवर्तन घडवू शकते. यापूर्वी मी हैदराबाद येथून पुण्यात येऊन मतदान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT