Pune Loksabha Election sakal
पुणे

Pune Loksabha Election : आम्ही तर मतदानाचा हक्क बजावला... जरा आमच्या अधिकाराकडे लक्ष द्या... पहा काय म्हणाल्या बुधवार पेठेतील महिला...

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. राज्यात पुण्यासह 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे.

सागर आव्हाड

पुणे - लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. राज्यात पुण्यासह 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. सकाळपासून नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वच घटकातून मतदान प्रक्रिया पार पडत असताना पुण्यातील बुधवार पेठ येथील देहविक्री करणाऱ्या महिलांनी देखील आपलं मतदानाचा हक्क बजावत आम्ही तर मतदानाचा हक्क बजावला आहे. पण आमच्या अधिकाराकडे जरा लक्ष द्या अस म्हटल आहे.

पुण्यासह राज्यातील 11 लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत असून पुणे लोकसभा मतदान संघात आत्ता प्रयत्न 26 टक्के मतदान झालं आहे. पुण्यातील बुधवार पेठेत देशभरातील अनेक भागातून महिला या देहविक्रीसाठी आलेले असून यातील जवळपास 1 हजार हून अधिक महिलांचं मतदान पुणे लोकसभा मतदार संघात नाव आलं असून आज या महिलांकडून देखील लोकशाही च्या या उत्सवात सहभाग घेतलेला पाहायला मिळालं.

यावेळी मतदान करून आलेल्या या महिलांनी सांगितल की आम्ही आता आमचं मतदानाचा हक्क बजावला आहे पण आम्हाला पण आमचे अधिकार मिळाले पाहिजे. आज अनेक संकटांना आम्हाला सामोरे जावे लागत आहे. कोणतेही सरकार यावं पण त्यांनी आमच्यासाठी चांगलं काम केलं पाहिजे. शासकीय योजना असतील तसेच अनेक समस्या असतील प्रत्येकाशी तोंड द्यावं लागत आहे आम्हाला देखील कामगार म्हणून मान्यता मिळायला हवी अस यावेळी या महिलांनी सांगितल आहे.

तसच ते पुढे म्हणाल्या की आम्ही तर पहिल्यांदा मतदान करत आहोत. पण आमच्या अनेक महिला असतील ज्यांना अजूनही कागदपत्र मिळालेलं नाही.आम्हाला आमच्या ज्या समस्या आहे त्या सोडवल्या गेल्या पाहिजे. आम्ही जे काम करतो ते काम करत असताना आजही तुच्छ नजरेने आमच्याकडे बघितले जातं. आम्हाला कोणत्याही शासकीय योजना देखील मिळत नसून ती देखील आम्हाला मिळावी हीच आमची अपेक्षा असल्याचे यावी या महिलांनी सांगितल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT