पुणे

लोणावळ्यात डीजे, लेझरचा वापर मर्यादेतच

CD

लोणावळा, ता. २५ : आगामी गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखून साजरा करण्यासाठी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात संयुक्त बैठक पार पडली. ‘‘डीजे आणि लेझर लाइटचा वापर नियमात राहूनच करा,’’ असे आवाहन पोलिसांनी गणेश मंडळांना केले.

या बैठकीला लोकप्रतिनिधी, नगरपालिका प्रशासन, महावितरणचे अधिकारी आणि विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीतील ध्वनीप्रदूषण, लेझर लाइटचे धोके आणि वाहतूक नियोजनावर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘‘मंडळांनी उत्सवाच्या काळात सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, तसेच आवश्यक त्या सर्व शासकीय परवानग्या वेळेत घ्याव्यात,’’ अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या.
गर्दीच्या नियोजनासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले. उत्सवात शिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन मंडळांनी दिले. महावितरणकडून गणेश मंडळांना आवश्यक वीजपुरवठा व तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. मिरवणुकीच्या मार्गावर वीजवाहिन्यांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी मंडळांनी केली.

गणेशोत्सव हा सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा उत्सव आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन मंडळांनी करावे. गुलालाचा अतिवापर टाळावा, लेझर लाइट आणि डीजेचा वापरही टाळावा.
- राजेंद्र सोनवणे, नगराध्यक्ष, लोणावळा

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी. लोणावळ्याची शांतता, सुव्यवस्था आणि गणेशोत्सवाची विधायक परंपरा कायम ठेवावी.
- सचिन पाटील, पोलिस निरीक्षक, लोणावळा शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT