Accident Sakal
पुणे

लोणावळा : बोर घाटात तीन वाहनांचा अपघाता; दोन ठार दोन जखमी

अपघानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

लोणावळा : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.  शनिवारी (ता.१९) द्रुतगती मार्गावर फुडमॉल जवळ (किलोमीटर क्रमांक ३६ ) दुपारी दोन कंटेनर व मोटारीच्या विचित्र अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघातातील मृतांची नावे समजू शकली नाहीत. तर अनिता सिंग (वय-५४), अखिलेश सिंग (वय-५५, रा.पुणे) अशी जखमींची नावे आहेत. (Pune Mumbai Road Accident News)

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर चे पानावरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या अन्य एका कंटेनर व कारला जोरात धडक दिली या घटनेत कंटेनर मार्गावरील लगत खड्ड्यात जाऊन आडवा झाला. यामध्ये कंटेनर चालक व क्लीनरचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारीतील अनिता सिंग व अखिलेश सिंग हे जखमी झाले अनिता सिंग यांची प्रकृती गंभीर आहे.

त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस, खोपोली पोलिस, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य सेवा मदत पथक घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

द्रुतगती वरील अपघातांची मालिका सुरूच

द्रुतगती वरील अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी (ता.१५) रोजी खोपोली एक्झिट जवळ सहा वाहनांचा अपघात झाला होता. या अपघातात सोलापूरातील काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षासह त्यांच्या तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

Maharashtra Land: राज्य सरकारचा मोठा निर्णय! वर्ग-२ जमिनी थेट वर्ग-१ मध्ये; लाखो भूखंडधारकांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा

Matar Khasta Kachori: मैद्याची कुरकुरीत कचौरी अन् चिंच-गुळाची चटणी; जाणून घ्या बाराबंकीच्या प्रसिद्ध 'मटर खस्ता'ची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT