पुणे

मद्यधुंद कारचालक लोणी पोलिसाच्या ताब्यात

CD

लोणी काळभोर, ता. १६ : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील लोणी स्टेशन चौकात एका भरधाव चारचाकी दुसऱ्या चारचाकीला घासल्याने नुकसान झाल्याची घटना घडली. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी घडलेल्या या प्रकारात भरधाव चारचाकीचालकाने मद्यप्राशन केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मदअझर मोहम्मदगौस शेख (वय ४७, रा. कॅम्प, पुणे) यांनी गुरुवारी (ता. १५) लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शेख हे ८ ऑक्टोबरला पत्नी आणि मुलांसह आपल्या कारमधून बारामती तालुक्यातील सुपा येथे दर्ग्याच्या दर्शनासाठी निघाले होते. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते लोणी स्टेशन चौकात पोहोचले. महामार्गाच्या दुभाजकाजवळ ट्रक उभा असल्याने त्यांनी कार मधल्या लेनमधून पुढे घेतली. सिग्नलजवळ वाहतुकीचा वेग कमी केला असताना डाव्या बाजूने भरधाव वेगात असलेल्या कारचालकाने अचानक उजवीकडे वळण घेतले. यावेळी शेख यांच्या कारला भरधाव चारचाकी घासल्याने त्यांच्या कारच्या दरवाजाच्या खालच्या भागाचे नुकसान झाले.
भरधाव कारचा चालक श्‍याम दशरथ कावळे (वय २७, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, मूळ रा. धाराशिव) याला थांबविले असता त्याच्या तोंडातून उग्र वास येत असल्याने त्याने मद्यप्राशन केले असावे, असा संशय शेख यांनी व्यक्त केला. पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले असून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात केलं दाखल; उपचार सुरू

CJP Protest: भारतातील आंदोलनांना खरंच अमेरिकेतून फंडिंग? प्रसिद्ध गायिकेने थेट उद्योगपतीचं नाव घेत केला आरोप

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत भाविकांना लुटणाऱ्या टोळीकडून २१ लाखांचे दागिने जप्त; उत्तर प्रदेशातील टोळीवर फरासखाना पोलिसांची कारवाई

Dive Ghat Close : पालखी महामार्गाच्या कामासाठी दिवेघाट दोन तास बंद

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

SCROLL FOR NEXT