Lumpy Skin Disease patients found again Pune health doctor hospital  Sakal
पुणे

Lumpy Skin Disease : लंपी स्कीन पुणे जिल्ह्यात पुन्हा संशयित रुग्ण आढळले

दौंडमध्ये बुधवारी सात संशयित जनावरे सापड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून लंपी स्कीन आजारमुक्त झालेल्या पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१२) पुन्हा लंपी स्कीन आजाराची संशयित सात जनावरे सापडली आहेत. ही सातही जनावरे दौंड तालुक्यातील असून या सर्वांचे नमुने (सॅंपल्स) तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

या नमुन्यांचे तपासणी अहवाल येत्या दोन दिवसात प्राप्त होतील. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुणे जिल्ह्यात पुन्हा लंपी स्कीन आजाराचा संसर्ग सुरु झाला की नाही, हे कळू शकणार आहे.पुणे जिल्ह्यात जानेवारी २०२३ पासून एकही लंपी स्कीन बाधित जनावर नव्हते. त्यामुळे जिल्हा मागील तीन महिन्यांपासून लंपी स्कीन आजारमुक्त झाल्याचे मानले जात होते.

परंतु आज जा परंतु आज पुन्हा संशयित जनावरे सापडल्याने लंपी स्कीन आजारमुक्त पुणे जिल्ह्यात पुन्हा हा आजार बळावतो की काय, अशी शंका पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित केली आहे.

मात्र कोणतेही संसर्गजन्य आजार असोत, ते एकाच वर्षात कधीही कायमस्वरूपी जात नाहीत. ते टप्प्याटप्प्याने पुन्हा पुन्हा उदभवत असतात, असा आजवरचा अनुभव असल्याचे जिल्हा परिषदेतील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी बुधवारी (ता.१२) सांगितले.

जिल्ह्यात २६ आॅगस्ट २०२२ रोजी लंपी स्कीन आजाराचे पहिले जनावर सापडले होते. तेव्हापासून ३१ डिसेंबर २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील एकूण १२ हजार ३७९ जनावरे या आजाराने बाधित झाली होती.

त्यापैकी ११ हजार २३७ जनावरे ही या आजारातून पूर्णपणे बरी झाली. उर्वरित १ हजार १४२ जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला. लंपी स्कीन आजारामुळे मृत्यू झालेल्या जनावरांमध्ये ७७० गाई, १९१ बैल आणि १८१ वासरांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT