पुणे

रंजक अभिवाचनातून उलगडल्या ‘तात्यांच्या प्राणिकथा’

CD

दाद

- नीला शर्मा
नामवंत साहित्यिक, चित्रकार आणि वन्यजीवन अभ्यासक व्यंकटेश माडगूळकर यांनी प्राण्यांसंबंधी लिहिलेल्या कथांचे अभिवाचन नुकतेच रसिकांनी हिराबागेतील श्रीराम लागू रंग अवकाश येथे अनुभवले.‌ ‘तात्यांच्या प्राणिकथा,’ ऐकताना, पडद्यावर त्यांनी रेखाटलेली चित्रे प्रदर्शित केल्यामुळे कथा अधिक रंजक वाटल्या.
माडगूळकर ऊर्फ तात्यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने ‘व्यंकटेश माडगूळकर अभिधान’ निर्मित या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी वयाच्या १७व्या वर्षी प्रथमच लिहिलेल्या ‘काळ्या तोंडाची,’ या कथेने झाली. शिवा कुत्रा आणि चंपी कुत्री यांच्यातील हृद्य नात्याची ही कथा विलक्षण होती. प्र. के. अत्रे संपादक असलेल्या ‘नवयुग’च्या अंकात प्रसिद्ध झालेली ‘वडारवाडीच्या वस्तीत,’ ही कथा हऱ्या मेंढ्यांच्या आयुष्यातील हृदयद्रावक घटनांनी व्यथित करून गेली. त्याच्यावर चालून आलेल्या लांडग्याला जिवंत पकडणारी लक्ष्मी ही तरुणी त्याला संरक्षक वाटू लागली.‌ नंतर छळ करणाऱ्या नवऱ्यापासून हऱ्याने तिची कशी सुटका केली,
हे ऐकताना काळजाचा थरकाप उडाला.‌ ‘व्याघ्री’ या कथेत, शिकार केलेल्या मादी बिबळ्याच्या निमित्ताने भयकातर करणारे वर्णन रसिकांची धडधड वाढवत होते.‌ ‘माझं गुणी जनावर,’ या कथेतील, मूळ मालकाशी निष्ठावंत राहिलेल्या
तट्टाच्या विनोदी हकिकतींनी बहार आणली.‌
ज्ञानदा माडगूळकर- नाईक यांची संकल्पना व निवेदन असलेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मोहन माडगूळकर यांचे होते. त्यांच्यासह प्रमिती नरके, सचिन भुसारी, सई जोशी, सारंग जोशी व राधिका माडगूळकर यांच्या अभिवाचनातून या सुरस कथा उलगडल्या. भूमिका घोरपडे यांनी दिलेले पार्श्वसंगीत पूरक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gandhinagar: अमित शाहांच्या मतदारसंघात काय घडलं? गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?

UPI MDR Charges: PhonePe, Google Pay वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; MDR शुल्कांबाबत मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27 : गड आला, पण...! मुंबईने डावाने विजयासह बोनस गुण कमावला, मात्र आयुष म्हात्रे ६ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला; नेमकं काय घडलं?

संतूर मॉम! रश्मी अनपट आहे आठ वर्षाच्या मुलाची आई; शेअर केले खास फोटो; नेटकरी म्हणाले- याची बायको आली की तू...

Latest Marathi News Live Update: यूपीआयवरील चार्जेस दिवाळीनंतर लागू होणार

SCROLL FOR NEXT