पुणे

माढा तालुक्यात शिक्षकसाठी ८७.४८ टक्के व पदवीधरसाठी ७२.१२‌ टक्के शांततेत मतदान ; दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला; नऊ शिक्षक तर तेरा पदवीधर मतदान केंद्रांवर प्रक्रिया

CD

MDH26B05715
माढा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले मतदार.

लोगो : माढा तालुका

दुपारी बारानंतर वाढला मतदारांचा प्रतिसाद
शिक्षकांसाठी ८७.४८, तर पदवीधरांसाठी ७२.१२ टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २३ : पुणे शिक्षक मतदारसंघासाठी माढा तालुक्यात ८७.४८ टक्के, तर पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ७२.१२ टक्के मतदान झाले. तालुक्यातील सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता. मात्र, दुपारी बारानंतर मतदारांचा प्रतिसाद वाढला.
शिक्षक मतदारसंघासाठी एकूण १,६३७ मतदारांपैकी १,४३२ (८७.४८ टक्के), तर पदवीधर मतदारसंघासाठी ५,९६८ मतदारांपैकी ४,३०४ (७२.१२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिक्षक आणि पदवीधरांना मतदान करता यावे, यासाठी तालुक्यातील अनेक शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी मतदानाचा वेग मंदावला; मात्र दुपारी बारानंतर त्यात वाढ झाली.
माढा विधानसभा मतदारसंघातील दारफळ, लऊळ, माढा, मोडनिंब, टेंभुर्णी, महाळुंग, करकंब आणि पटवर्धन कुरोली येथे शिक्षक मतदारसंघासाठी नऊ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. पदवीधर मतदारसंघासाठी दारफळ, लऊळ, माढा येथे दोन, मोडनिंब, टेंभुर्णी, महाळुंग आणि करकंब येथे प्रत्येकी दोन, तसेच तुंगत आणि पटवर्धन कुरोली येथे मतदान केंद्रे होती. या मतदारसंघासाठी एकूण १३ केंद्रांवर मतदान झाले. दोन्ही मतदारसंघांतील मतदान शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. यंदाच्या निवडणुकीत राजकीय पक्षही मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

IND vs NZ T20 : भारतीय संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे इशान किशन दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकणार

SCROLL FOR NEXT