पुणे

बारामतीतील ‘महालक्ष्मी’चा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

CD

बारामती, ता. १८ : ग्रामीण भागात वाहन विक्री आणि ग्राहकसेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बारामतीतील मारुती सुझुकीचे अधिकृत वितरक महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज यांनी राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.
मलेशियातील क्वालालंपूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजचे व्यवस्थापकीय संचालक नितीन सातव यांना मारुती सुझुकी कंपनीच्या वतीने उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजने सर्वाधिक वर्कशॉप लोड ग्रोथ (४५०० पेक्षा जास्त मासिक भार), सर्वाधिक विस्तारित हमी विक्री टक्केवारी (६००० ते १२००० रिटेल्स- अरेना चॅनेल), तसेच १२ हजारपेक्षा जास्त वाहन विक्रीच्या श्रेणीत वर्षानुवर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट वाहन नोंदणी अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याशिवाय ग्राहक समाधानामध्येही कंपनीने मोठी आघाडी घेत सर्वाधिक नेट प्रमोटर स्कोअर अरेना आणि नेक्सा या दोन्ही चॅनेलमध्ये मिळविला आहे.
ग्रामीण भागात वाहन विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित करत ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजच्या या यशामुळे बारामतीच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्राची राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. या गौरव सोहळ्यास राहुल अग्रवाल आणि विवेक सरोदे उपस्थित होते. ग्राहकांनी दाखविलेला विश्वास यामुळे महालक्ष्मी ऑटोमोटिव्हजने हे उत्तुंग यश संपादन केल्याची भावना नितीन सातव यांनी बोलून दाखवली.

15030

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आम्ही घाबरणार नाही, माघारही घेणार नाही! अभिजित दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन, नेमकं काय म्हणाले?

Satara Farmer Loan Waiver: साताऱ्यात ७,७८९ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित; कर्जमाफी होऊनही पात्रतेचा खोडा, धक्कादायक कराण आल समाेर!

सासऱ्यांनी सांगितलं एका वर्षाचा आत वजन घटव... कविता मेढेकर यांचा खुलासा, म्हणाल्या, 'माझे सासू-सासरे...'

Spinal Pain: पाठीच्या कण्याच्या आरोग्यासाठी कोणत्या कुशीवर झोपणे योग्य? पाठ टेकून झोपण्याचेही आहेत फायदे!

2026 च्या शेवटच्या 3 महिन्यांची बाबा वेंगांची भविष्य वाणी व्हायरल; ‘या’ राशींबाबत चर्चांना उधाण!

SCROLL FOR NEXT