Fire Sakal
पुणे

Kondhwa News : महंमदवाडीत अकराव्या मजल्यावर आग; कोणतीही जीवितहानी नाही

महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलजवळील मॅजिस्टीक युरीस्का या अकरा मजली इमारतीत शेवटच्या मजल्यावरील एका सदनिकेला मोठ्या प्रमाणात आग लागली होती.

सकाळ वृत्तसेवा

कोंढवा - महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलजवळील मॅजिस्टीक युरीस्का या अकरा मजली इमारतीत शेवटच्या मजल्यावरील एका सदनिकेला मोठ्या प्रमाणात आग लागली होती. कोंढवा अग्निशामक दलाने वर्दी मिळताच घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

अग्निशमन जवानांनी धुरामुळे प्रथम गच्चीवर असलेल्या चार पुरुष आणि दोन महिला अशा सहा जणांना बीए सेट परिधान करत सुखरुप ठिकाणी हलविले आणि पाण्याचा मारा सुरु केला. तसेच, आग इमारतीत इतरत्र पोहोचणार नाही, याची खबरदारी घेतल्याने मोठा धोका टळला. वीस मिनिटात जवानांनी आग नियंत्रणात आणत कुलिंग सुरू केले.

सदर सदनिकेतील सर्व गृहपयोगी साहित्य जळाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर इमारतीत असणारी स्थायी अग्निशमन यंत्रणा बंद अवस्थेत होती. सदर ठिकाणी आग मोठ्या स्वरूपात असल्याने आठ अग्निशमन वाहनांसोबत उंच शिडीचे वाहन रवाना करण्यात आले होते. जवानांनी वेळेत आग आटोक्यात आणत मोठा धोका टाळला.

अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, समीर शेख, प्रमोद सोनावणे, पंकज जगताप, राजेश जगताप, सुभाष जाधव व इतर सुमारे ३० जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT