पुणे

पुण्यातील आणखी १६ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी

CD

पुणे, ता. २२ : राज्यातील आणखी एक लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत गुरुवारी राज्य सरकारने चौथी यादी प्रसिद्ध केली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीक कर्ज खाती असलेल्या शेतकऱ्यांना या यादीत स्थान दिले आहे.
शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची रक्कम कर्ज खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने या योजनेंतर्गत यापूर्वी तीन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत चार लाख १९ हजार ७३७, तर तिसऱ्या यादीत तीन लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश होता. या तीन याद्यांमधून आत्तापर्यंत २४ लाख ६७ हजार १३० शेतकऱ्यांचा समावेश केला आहे. आता चौथ्या यादीत आणखी एक लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश झाल्याने एकूण लाभार्थ्यांची संख्या २५ लाख ८२ हजार ८२७ झाली आहे. या योजनेसाठी बँकांनी ३१.१७ लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली आहे. महाआयटीकडून या माहितीचे संगणकीय परीक्षण करण्यात येत आहे. या योजनेत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे.

महत्त्वाचे...
- ३१ मार्च २०२६ ची थकबाकी तपासून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक
- दोन लाखांवरील थकबाकीलाही ‘हेअरकट’ धोरणानुसार कर्जमाफी
- मृत, वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्यपद्धती
- चौथ्या यादीतील नावे बँका, विकास संस्था व ग्रामपंचायतींत प्रसिद्ध

दृष्टिक्षेपात...
जिल्हा बँक : ७३,९२१
व्यापारी बँका : ४१,७७६

चौथ्या यादीतील लाभार्थी
विभाग -- शेतकरी
पुणे -- ३०,२४७
नागपूर -- ४,६०२
अमरावती -- १३,३४०
छत्रपती संभाजीनगर -- ४७,५४७
नाशिक -- १४,१६५
कोकण -- ५,७९६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT