पुणे

गहुंजे-कुसगाव सेवा रस्त्यासाठी भूमाता शेतकरी संघटना आक्रमक

CD

सोमाटणे, ता. ३० ः अडीच दशकांपासून मागणी करूनही द्रुतगती मार्ग सेवा रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ भूमाता शेतकरी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भूमाता शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर, भारतीय किसान संघाचे मावळ तालुका अध्यक्ष विश्वनाथ शेलार, माजी नगराध्यक्ष कृष्णाजी कारके, सुनिल गुजर, डॉ. निलेश मुऱ्हे, गुलाबराव घारे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आता हा निर्णायक लढा असल्याचे म्हटले आहे. द्रुतगती मार्गाचे काम २००० मध्ये पूर्ण झाल्यानंतर गहुंजे ते कुसगाव दरम्यानच्या गावांसाठी सेवा रस्ता करून देणे आवश्यक होते. परंतु महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी या गावातील नागरिकांची दळणवळणाची अडचण कायम आहे. बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी धामणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूमाता शेतकरी कृती समिती उदयास आली. या संघटनेने अनेक वेळा सेवा रस्ता मागणीसाठी निवेदन, आंदोलन, मोर्चा अशा मार्गांचा अवलंब केला, परंतु दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या मातीच्या रस्त्याशिवाय त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. या परिस्थितीचा विचार करून कायमस्वरूपी खडीडांबरीकरणाच्या रस्त्याच्या मागणीसाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. रस्ते विकास महामंडळाने तातडीने पक्का रस्ता करावा, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
फोटो
---
45877
-------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?

Skin Care: ड्रेसिंग टेबलवर वर्षांनुवर्षे पडलेला परफ्युम सुरक्षित आहे का? त्वचेसाठी ठरू शकतो घातक; 'हे' बदल दिसताच वापरणे करा बंद! 

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

द ग्रेट खलीच्या कारचा अपघात; अशी झाली अवस्था, व्हिडीओ शेअर करत सांगितलं काय घडलं

SCROLL FOR NEXT