maharashtra presidents medal announced to 9 jail officers for meritorious service Sakal
पुणे

Presidents Medal : कारागृह विभागातील नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

महाराष्ट्र कारागृह विभागातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल वर्ष २०२४ साठी राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक केंद्रीय गृह विभागाकडून गुरुवारी (ता. २५) जाहीर करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : महाराष्ट्र कारागृह विभागातील नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल वर्ष २०२४ साठी राष्ट्रपतींचे सुधार सेवा पदक केंद्रीय गृह विभागाकडून गुरुवारी (ता. २५) जाहीर करण्यात आले आहे.

राष्ट्रपती पदक जाहीर केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे-

रुकमाजी भुमन्ना नरोड (तुरुंगाधिकारी श्रेणी-१, अहमदनगर जिल्हा कारागृह), सुनील यशवंत पाटील (तुरुंगाधिकारी श्रेणी-१, तळोजा मध्यवर्ती कारागृह), बळिराम पर्वत पाटील (सुभेदार, मुंबई मध्यवर्ती कारागृह), सतीश बापूराव गुंगे (सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), सूर्यकांत पांडुरंग पाटील (हवालदार, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह),

नामदेव संभाजी भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), संतोष रामनाथ जगदाळे (हवालदार, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह), नवनाथ सोपान भोसले (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), विठ्ठल श्रीराम उगले (हवालदार, अकोला जिल्हा कारागृह).

राष्ट्रपतींचे सुधार सेवापदक जाहीर झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कारागृह विभागाच्या वतीने अतिरिक्त पोलिस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) जालिंदर सुपेकर यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवा कालावधीत सचोटी व कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेचा सन्मान झाला आहे, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त पोलिस महासंचालक गुप्ता यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Update: गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला! नियम बदलल्यानंतर दरातही बदल? महाराष्ट्रात LPG सिलेंडर आता कितीला?

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाचे भाव वाढले! CNG दरवाढीनंतर आता पेट्रोल-डिझेलही महाग? पाहा महाराष्ट्रातील आजचे दर

‘ती’ पुन्हा येतेय! नजरेत तलवार, चाल अंगार, झी मराठीच्या नव्या मालिकेच्या प्रोमोतील ‘ती’ अभिनेत्री नेमकी कोण?

Pune Satara Highway: खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी ट्रक पलटी; दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहतूक विस्कळीत

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

SCROLL FOR NEXT