पुणे

महूदमध्ये विनापरवाना वाहनांवर सांगोला पोलिसांची कारवाई!

CD

MHD26B05632
महूद (ता. सांगोला) : येथे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करताना पोलिस कर्मचारी.
---
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका!
महूद पोलिस ॲक्शन मोडवर; २२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल
सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. २३ : येथील मुख्य चौक परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांनी विनापरवाना मोटारसायकली आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत २२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे आणि सहायक पोलिस निरीक्षक भारत वाघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस कर्मचारी नितीन घुले, दीपक लेंगरे, सतीश धुमाळ, दरदरे, इंगळे, मंडले आणि पोलिस पाटील प्रभाकर कांबळे यांच्या पथकाने मोहिमेत सहभाग घेतला.
महूदच्या मुख्य चौकात वाहने अस्ताव्यस्त उभी केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहने रस्त्यावर कुठेही उभी न करता योग्य ठिकाणी एका बाजूला पार्क करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
---
चौकट
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. वाहन चालविण्याचा वैध परवाना जवळ ठेवावा आणि वाहने योग्य ठिकाणी पार्क करावीत. पोलिसांच्या सूचनांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT