रापणीच्या आगीत मोठी हानी
मालवण (जि.सिंधुदुर्ग), ता. २४ : तारकर्ली वरचीवाडी येथील एका पारंपरिक रापण मासेमारी व्यावसायिकाच्या रापणीच्या कावनाला शुक्रवारी रात्री अचानक भीषण आग लागली. यामध्ये मासेमारीच्या होड्या, लाखो रुपयांची जाळी आणि मासेमारीचे इतर महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले. ऐन मासेमारीच्या हंगामात हक्काचे साधन जळाल्यामुळे कांदळगावकर कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या एकाच रापण संघावर सुमारे १०० हून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने सगळ्यांना याचा फटका बसणार आहे.
तारकर्ली वरचीवाडी किनाऱ्यालगत गुंडू कांदळगावकर यांचे रापणीचे कावण (रापणीचे साहित्य एकत्र ठेवलेले ठिकाण) आहे. ही शेड बंद असताना अचानक तेथे भीषण आगीचा भडका उडाला. आग कशी लागली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत पोलिसांकडून आणि संबंधित विभागाकडून कसून चौकशी सुरू आहे. यात केवळ कांदळगावकर यांचेच नव्हे, तर इतर व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. गुंडू कांदळगावकर यांच्या या रापण संघातून १०० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत होता. या आगीत रापणीसाठी लागणारी महागडी नायलॉनची जाळी, होड्या आणि इतर अत्यावश्यक साहित्य जळल्यामुळे या कुटुंबांसमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.