man who set himself on fire in front of the Wagholi police station died marthi Crime News  
पुणे

Pune Crime News : मृत्यूशी झुंज अपयशी! वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या त्या तरुणाचा अखेर मृत्यू

शहरातील पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाघोली पोलीस चौकीत स्वतःला पेटवून घेतलेल्या रोहिदास अशोक जाधव या तरुणाचा आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. सात दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली. त्याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.

नेमकं झालं काय होतं?

मारहाण करणाऱ्याना पोलीस अटक करीत नसल्यामुळे रोहिदास याने १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकीत स्वतःला पेटवून घेतले होते. यामध्ये तो ९० तक्के भाजला होता. त्याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तो राहत असलेल्या सोसायटी मध्ये पार्किंग, पाणी व अन्य कारणावरून त्याला सोसायटीतील काही जण व बांधकाम व्यवसायिक त्रास देत होते. याबाबत त्याने तक्रार दाखल केली होती.

लोणीकंद पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यांना अटक करावी अशी त्याची मागणी होती. याच कारणास्तव त्याने स्वतःला पोलीस चौकीत पेटवून घेतले होते. त्याने सात दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र ती अयशस्वी ठरली. दरम्यान या कारणास्तव तीन पोलीसांना पोलीस आयुक्तांनी निलंबीत केले तर लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांची विशेष शाखेत बदली केली. तर या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहिदास हा मूळचा दौंड तालुक्यातील गिरीम गावचा आहे. त्याचे आई वडील गावी असतात. त्याच्या मागे आई वडील, पत्नी व दोन मुले आहेत. त्याला दोन भाऊ आहेत. त्याचा वाघोलीत इलेक्ट्रिकलचा व्यावसाय होता. त्याच्यावर त्याच्या मूळगावीच अंत्यसंस्कार करणार असल्याचे कळते. दरम्यान गुन्हा दाखल असलेल्या सर्वांना अटक करावी व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी नातेवाईकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT