dilip walse patil and sharad pawar sakal
पुणे

Dilip Walse Patil : ‘पवार साहेबांना स्वबळावर एकदाही सत्ता नाही’

नवी दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली.

सकाळ वृत्तसेवा

मंचर - ‘नवी दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर सत्ता स्थापन केली. पण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकदाही स्वबळावर सत्ता आली नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज केले.

येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ६० ते ७० आमदारांपेक्षा जास्त आमदार निवडून आले नाहीत. राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा माझा, अजित पवार किंवा अन्य सहकाऱ्यांचा नव्हता तर बहुसंख्य आमदारांचा होता.’

‘विकासकामे होत नसल्याने आमदारांमध्ये चलबिचल व अस्वस्थता सुरू होती. हा विषय आम्ही पवार यांच्याकडे मांडला होता. पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. विचारविनिमय करूनच निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आम्ही भाजपमध्ये गेलो असा नसून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत,’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis:...हा तर पोळी भाजण्याचा डाव; दिल्लीतील आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Revenue Department: महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल; चंद्रशेखर बावनकुळे: मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Live Updates Marathi : सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेला तयार

Petrol-Diesel Price Today: अमेरिकेत पेट्रोल महागल्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! मुंबई-पुण्यात काय आहे भाव?

Farmer Loan Waiver: दोन लाख शेतकरी पहिल्या यादीत; कर्जमुक्ती योजना; आधार प्रमाणीकरण, फार्मर आयडी अनिवार्य

SCROLL FOR NEXT