Caste Certificate es0akal
पुणे

Manchar News : 'शासन आपल्या दारी' उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार सर्व प्रकारचे दाखले - गोविंद शिंदे

महात्मा गांधी विद्यालयात बुधवारी (ता. १७) झालेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत गोविंद शिंदे बोलत होते.

डी. के. वळसे पाटील

मंचर - आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ९वी ते इयत्ता १२ वी वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे दाखले शुक्रवार (ता. १९) ते सोमवार (ता. २२) या कालावधीत शाळेतच मिळण्याची व्यवस्था केली आहे.' अशी माहिती जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात बुधवारी (ता. १७) झालेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनीस, आंबेगावचे प्रभारी तहसिलदार आनंता गवारी, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, नायब तहसिलदार सचिन वाघ, शांताराम किरवे, सविता माळी, अनिता शिंदे, गजानन पुरी, संचिता अभंग उपस्थित होत्या.

शिंदे म्हणाले, 'शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यासोबत योग्य पुरावे जोडावेत. तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत तातडीने वय, अधिवास व राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमीलेयर,जातीचे, उत्पन्नाचे, रहिवासी, एस ई सी, डोंगरी, शेतकरी, अल्पभूधारक आदी दाखले तसेच १८ वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मतदार नाव नोंदणी होईल.

मुख्याध्यापक,प्राचार्य,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ई महा सेवा केंद्र संचालक, तलाठी यांच्या मदतीने शाळेत सर्व प्रकारचे दाखले महाशिबिराद्वारे उपलब्ध होतील.

प्राचार्य अशोक वळसे पाटील, प्राचार्य उत्तम आवारी, तबाजी वागदरे, अशोक काकडे, साहेबराव शिंदे, यादव, चासकर यांनी चर्चेत भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT