पुणे

मंचरवर पाणीटंचाईचे सावट

CD

मंचर, ता. १४ : मंचर (ता. आंबेगाव) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील घोड नदीवरील बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात येत असून, केवळ १५ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. यामुळे शहरावर पाणीसंकट ओढवण्याची शक्यता असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष संदीप थोरात, नगरसेवक वसंतराव बाणखेले, शिवाजीराव राजगुरू, विकास जाधव, मालती थोरात, वंदना बाणखेले, विशाल आवळे आणि अधिकारी राजश्री मोरे यांनी सुलतानपूर येथील विहीर व बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाणीसाठा अत्यंत कमी असल्याचे समोर आले. डिंभे धरणातून तातडीने पाणी सोडावे आणि बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मण थोरात यांनी दिली.

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. अनावश्यक अपव्यय टाळून पाणी वाचविण्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करावे.
- लक्ष्मण थोरात-भक्ते, उपनगराध्यक्ष, मंचर नगरपंचायत

दृष्टीक्षेपात
-सुलतानपूर बंधाऱ्यात १५ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक
-दररोज ३५ लाख लिटर पाणीपुरवठा
-१५० अश्वशक्तीच्या दोन विद्युत मोटारी
-शहरातील ५ हजार ५५० घरगुती व व्यावसायिक नळजोडण्या
-अधिकृत लोकसंख्या ४५ हजार, प्रत्यक्षात ५० हजारांहून अधिक
-शहरात ५५ किलोमीटर लांबीची जलवाहिनी व्यवस्था

15782

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : "शेतकऱ्यांचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही"; ५ हजारांच्या मदतीवरून अनिल देशमुखांची टीका

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT